Melghat Jungle Safari : मेळघाट सफारी महागणार? भाडेवाढ मागणीसाठी ३ दिवसांपासून सफारी बंद, पर्यटकांचा हिरमोड!

अमरावती : विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुट्टी सुरु (Summer Holiday) झाली असून याकाळात अनेकजण कुटुंबासह किंवा मित्रपरिवारासह विविध ठिकाणी फिरायला जातात. सुट्टीच्या दिवशी महाराष्ट्रातील अभ्यारण्यांना भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र यावेळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत (Melghat Jungle Safari) येणारी शहानूर येथील जंगल व नरनाळा किल्ला सफारीला जाणाऱ्या पर्यटकांकडून नाराजीचा सूर मारला जात आहे.  मे महिना सुरु होताच तीन दिवस मेळघाट सफारी बंद असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.



मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोटवन्यजीवविभागामध्येनरनाळा किल्ला व शहानूर येथील जंगलाचा समावेश आहे. नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी शहानूर येथे वन पर्यटन केंद्र असून त्या ठिकाणावरून नरनाळा किल्ला व शहानूर जंगलासाठी सफारी केली जाते. यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून ही सफारी बंद आहे. १ मे पासून वन पर्यटन संघटनेच्या जिप्सी चालकांनी भाडेवाढ करण्याच्या मागणीसाठी बंद पुकारला. पेट्रोलचे वाढलेले दर लक्षात घेता व पर्यटन मार्गात नव्याने वाढ झाल्यामुळे स्थानिकांचा रोजगार देखील बुडात चालला आहे. त्यामुळे शहानूर सफारीचे केवळ जिप्सीप्रवास भाडे अडीच हजारावरून चार हजार व नरनाळा किल्ला सफारीचे दीड हजारावरून अडीच हजार करण्याची मागणी संघटनेने केली. (Melghat Jungle Safari)



काय आहेत मागण्या?


करोना काळामुळे बंद केलेली रात्रीची सफारी व पूर्ण दिवसाची सफारी सुरू करण्यात यावी, नरनाळा परिक्षेत्रातील बफर क्षेत्रात मचाण सुरू करावे, शहानूर सफारी द्वारावरील गाईड व जिप्सी चालक यांनागणवेश व ओळखपत्र द्यावे, शहानूर सफारी मार्गावरील खासगी सर्व वाहने बंद करण्यात यावी, शहानूर सफारी द्वार ते नरनाळा किल्ला दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण होत असल्यामुळे पावसाळ्यात नरनाळा किल्ला सफारी सुरु ठेवावी, जिप्सी गाईड व जिप्सी चालक यांना प्रशिक्षण देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने अकोट वन्यजीव विभागात देण्यात आले. (Melghat Jungle Safari)

Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी