Health Tips : उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, जाणून घ्या

मुंबई : उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड असलं पाहिजे. त्यामुळे निरोगी राहण्यास मदत होईल.


शरीरामध्ये योग्य प्रमाणात पाण्याची मात्रा असल्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अनेकवेळा उन्हाळ्यातील तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांची आग होते किंवा त्यांच्यामधून सतत पाणी येते. ही स्थिती गंभीर नाही परंतु जास्त काळ दुर्लक्ष केल्यास तुमच्या डोळ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.


उन्हाळा येताच अनेकांना डोळ्यांत जळजळ, लालसरपणा आणि पाणी येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. ही एक सामान्य समस्या वाटू शकते, परंतु जर दुर्लक्ष केले तर ती मोठ्या आजारांचे लक्षण देखील असू शकते. आज आपण उन्हाळ्यातील डोळ्यांच्या या समस्यांची कारणे काय असू शकतात, कोणत्या आजारांचे हे लक्षण असू शकते आणि ते टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊ.



उन्हाळ्यात डोळ्यातून पाणी येण्याची कारणे….


धूळ आणि प्रदूषण - उन्हाळ्याच्या दिवसात धूळ आणि प्रदूषण जास्त असते, ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होऊ शकते.


डिहायड्रेशन - शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डोळे कोरडे पडतात आणि जळजळ होऊ लागते.


तीव्र सूर्यप्रकाश - तीव्र सूर्यप्रकाशाचा डोळ्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे डोळे लाल होऊ शकतात आणि त्यांच्यात जळजळ जाणवू शकते.


ऍलर्जी - उन्हाळ्यात, हवेत परागकण, धूळ आणि इतर ऍलर्जीक कण जास्त असतात, ज्यामुळे डोळ्यांना खाज सुटू शकते आणि पाणी येऊ शकते.


संसर्ग- उन्हाळ्याच्या हंगामात बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने पसरतात, ज्यामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह होण्यासारखे आजार होऊ शकतात.


जास्त स्क्रीन टाइम – मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीचा जास्त वापर केल्याने डोळे थकतात आणि त्यांना कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते.




डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?


जास्त पाणी प्या : शरीर हायड्रेटेड ठेवल्याने डोळे ओले राहतात आणि जळजळ होण्याची समस्या येत नाही.
सनग्लासेस घाला: उन्हात बाहेर पडताना डोळ्यांचे तेजस्वी सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी अतिनील संरक्षण चष्मे घाला.डोळे वारंवार धुवा : दिवसातून २-३ वेळा स्वच्छ पाण्याने डोळे धुतल्याने धूळ आणि घाण निघून जाते आणि जळजळ कमी होते.स्क्रीन टाइम कमी करा : जास्त वेळ मोबाईल आणि संगणक वापरणे टाळा आणि मध्येच ब्रेक घ्या.
थंड पट्टी लावा : डोळ्यांवर थंड पट्टी ठेवल्याने जळजळ आणि सूज कमी होते.
चांगली झोप घ्या : योग्य झोपेअभावी डोळ्यांवर ताण येतो, ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होते. डोळ्यांतून पाणी येऊ शकते.
डोळ्याचे थेंब वापरा : डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर योग्य डोळ्याचे थेंब वापरा, जेणेकरून डोळे ओले राहतील.
सकस आहार घ्या : हिरव्या भाज्या, फळे आणि व्हिटॅमिन ए ने समृद्ध असलेले अन्न खाल्ल्याने दृष्टी उत्तम राहते. निरोगी राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

रोज फिश ऑइल सप्लिमेंट्स घेताय? आधी हे वाचा !

मुंबई : सध्या निरोगी जीवनशैलीकडे झुकणाऱ्या अनेक लोकांचा कल हेल्दी डाएट, योगा, व्यायाम, आणि विविध सप्लिमेंट्सकडे

हे ६ पदार्थ देतात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम!

मुंबई : आपण बहुतांशवेळा कॅल्शियम म्हटले की दुधाचा विचार करतो. खरं तर, बऱ्याच लोकांना वाटतं की कॅल्शियम

वय वाढलं तरी त्वचा तरुण! 'या' ८ पदार्थांचे गुपित तुम्हाला माहितीयेत का?

मुंबई : त्वचेचं सौंदर्य फक्त बाहेरून लावल्या जाणाऱ्या क्रीम्स, फेस मास्क किंवा लोशन्सवर अवलंबून नसतं. यामागे खरा

डायट नाही, स्मार्ट डिनर : वजन कमी करण्याचा सोपा मार्ग !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक अनियमित आहार, लेट नाईट पार्ट्या आणि चुकीच्या खानपानाच्या सवयींमुळे

शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी आहे? आजच आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करा!

मुंबई : डेंग्यू किंवा इतर काही संसर्गजन्य आजारांमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे ही गंभीर बाब ठरू

आज आहे जागतिक हात धुण्याचा दिवस : नियमित हातांची स्वच्छता आवश्यक, आरोग्य प्रशासनाचे आवाहन

मुंबई : जागतिक हात धुण्याचा दिवस दि. १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. जगभरातील लोकांना त्यांच्या हात धुण्याच्या सवयी