'आतली बातमी फुटली' मध्ये दिसणार ‘टायगरभाई’

मुंबई :  मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे. आपल्या चित्रपटाची कथा लोकांपर्यंत पोहचावी यासाठी चित्रपटाची टीमही तितकीच मेहनत घेत असते. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार 'आतली बातमी फुटली' हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता विजय निकम याने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याच्या नव्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चर्चेचे कारणही तसंच आहे. ‘वीजी फिल्म्स’च्या 'आतली बातमी फुटली' चित्रपटात एका भाईची भूमिका तो साकारणार आहेत. ‘टायगरभाई’ असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.




काय म्हणाला अभिनेता विजय निकम ? 


मी साकारलेला ‘टायगरभाई’ हा चित्रपटात खूपच धमाल करताना दिसणार आहे. भूमिका ग्रे शेडची असली तरी माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे सोबत त्यात विनोदी बाज असल्याने ही भूमिका करायला मजा आली. मला ‘टायगरभाई’ च्या भूमिकेत पाहणं चाहत्यांना सुद्धा आवडेल यात शंका नाही. एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदा भोवती 'आतली बातमी फुटली' या सिनेमाची कथा फिरते. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकार या चित्रपटात धमाल उडवणार आहेत.


'आतली बातमी फुटली' या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.

Comments
Add Comment

२०२६ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला (शनिवार/रविवार) ओटीटी वर येणारे प्रोग्राम

या प्रजासत्ताक दिनी, धैर्य, न्याय, ओळख आणि बदल दर्शविणाऱ्या कथा पुन्हा एकदा पाहून स्वातंत्र्याचा सन्मान करूया.

धुमधडाक्यात प्रसाद ओकच्या मुलगा साखरपुडा संपन्न; कोण आहे होणारी सून ?

गेल्या काही दिवसांपासून मराठी फ्लीट इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रसाद

गमन : जीवनाला कलाटणी देणारे स्थलांतर

मुंबई :  स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो, पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी

जिथे धुरंधर १  थांबला, तिथून धुरंधर २  बोलेल: रणवीर सिंगचे दमदार संवाद

धुरंधर १  ची वारसा, धुरंधर २  चे वादळ: रणवीर सिंगच्या लक्षात राहणाऱ्या संवादांची झलक काही कलाकार असे असतात जे

शेफालीच्या मृत्यूमागे'काळी जादू' केल्याचा आरोप; अभिनेता पराग त्यागीचा खळबळजनक दावा

अभिनेता पराग त्यागीने पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये शेफाली जरीवालाच्या मृत्यूवर खळबळजनक वक्तव्य केले आहे.जून

भंसालींचा ‘लव्ह अँड वॉर’२०२६ मध्ये प्रदर्शित होणार; २०२७ च्या अफवांना सूत्रांकडून फेटाळणी

भंसालींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या प्रदर्शनावर शिक्कामोर्तब: २०२६ मध्येच येणार, २०२७च्या अफवा खोट्या ठरल्या संजय