'दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करणार'

नवी दिल्ली : दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करू, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ते अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्काल्व्हेस लॉरेन्को यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या लष्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले होते.एकूण चार हल्लेखोरांपैकी दोन हल्लेखोर पाकिस्तानचे नागरिक असल्याचे पुरावे भारताला मिळाले. हल्लेखोरांपैकी एक पाकिस्तानच्या सैन्याचा कमांडो असल्याचे पुरावे भारताच्या हाती आले आहेत.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदींनी इशारा दिला होता की सरकार न्याय देणार. प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखू, शोधू आणि शिक्षा करू. गरज पडली तर त्यांचा पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठलाग करू पण न्याय करू असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यानंतर अंगोलाच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करणार असल्याचे सांगितले.

भारताने पाकिस्तान विरुद्ध केलेली कारवाई

  1. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित

  2. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द

  3. अटारी सीमा बंद, भारत - पाकिस्तान व्यापार बंद

  4. पाकिस्तानच्या भारतीय दुतावासातील अधिकारी - कर्मचारी यांची संख्या कमी केली

  5. भारत - पाकिस्तान टपाल सेवा, विमान वाहतूक, जहाज वाहतूक, रस्ते मार्गाने होणारी वाहतूक आणि रेल्वे मार्गाने होणारी वाहतूक बंद

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या