Delhi Weather Thunderstorm: 'मे' च्या उकाड्यात, दिल्लीत वादळी पाऊस ! द्वारका येथे मोठी दुर्घटना

नवी दिल्ली: एका बाजूला मे चा कडक उन्हाळा सुरु झाला असताना, दिल्लीत अचानक आलेल्या पाऊसाने कहर केला आहे. (Delhi Weather Thunderstorm)  ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे


शुक्रवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दिल्ली-एनसीआरमध्ये आपत्तीचे रूप धारण केले. दिल्लीतील द्वारका येथे पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एका घरावर झाड कोसळले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे.


दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खारखरी कालवा गावात एका शेतात बांधलेल्या ट्यूबवेलच्या खोलीवर एक झाड पडले. या खोलीत एकूण पाच लोक झोपले होते. ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. मृतांची ओळख २६ वर्षीय ज्योती आणि तिची तीन मुले अशी झाली आहे. तर ज्योतीचा पती अजय किरकोळ जखमी झाला आहे.



वादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी


आज जोरदार वाऱ्यामुळे दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमधील अनेक भागात झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याचे वृत्त आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. हवामान खात्याने नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचा आणि आवश्यक नसल्यास बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.



खराब हवामानामुळे विमान उड्डाणांना विलंब


राजधानीतील बदलत्या हवामानामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतूक प्रभावित झाली. विमानतळ चालवणारी कंपनी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डायल) ने सांगितले की, खराब हवामानामुळे काही उड्डाणांवर परिणाम झाला. प्रतिकूल हवामानामुळे उत्तर भारतातील काही भागात विमान वाहतूक प्रभावित झाल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष