Railway Megablock : मध्य व पश्चिम रेल्वेचा ‘मेगाब्लॉक’ रद्द! नेमके कारण काय?

मुंबई : प्रत्येक आठवड्याच्या रविवार दिवशी मुंबई लोकलबाबत (Mumbai Local) तांत्रिक बिघाड दुरुस्तीची किंवा इतर कामे हाती घेतली जातात. त्यामुळे रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. येत्या रविवारी देखील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने यंत्रणा दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असल्याचे जाहीर केले होते. मात्र रविवार ४ मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करता रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक रद्द केला आहे.



वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट (एनईईटी-२०२५) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा प्रवास सुरळीत राहावा, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने रविवारी (ता. ४) रोजीचा उपनगरीय मार्गांवर नियोजित असलेला मेगा ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी कोणताही मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नीट परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रवासात अडथळा येणार नाही.



पश्चिम रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक


पश्चिम रेल्वेनेदेखील रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान अप व डाऊन फास्ट लाइनवर शनिवारी (ता. ३) मध्यरात्री १२.१५ ते ४.१५ दरम्यान चार तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या वेळी जलद गाड्या सांताक्रूझ ते चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील, अशी माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ

तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला

आश्रय योजनेतील पहिल्या ५१२ सदनिकांचे डिसेंबर अखेरपर्यंत सफाई कामगारांना होणार वाटप

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई