Thursday, May 1, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडी

'Zhapuk Zhapuk' : 'झापुक झुपूक' वादाच्या भोवऱ्यात

'Zhapuk Zhapuk' : 'झापुक झुपूक' वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : बिग बॉस ५ चा विजेता सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' या नुकत्याच रिलीज झालेल्या मराठी सिनेमातून झळकत आहे. बारामतीमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या सूरजने त्याच्या साधेपणाने सर्वांचंच मन जिंकून घेतलं. दिग्दर्शक केदार शिंदेंनी बिग बॉस मराठी सिझन ५ च्या मंचावरूनच त्याला थेट सिनेमात हिरोची भूमिका साकारण्याची संधी दिली. सूरजचा 'झापुक झुपूक' आता महाराष्ट्रातील सर्व थिएटर्समध्ये झळकत आहे. मात्र आता झापुक झुपूक या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

?si=kn7KN74O_ZRuBqoi

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रावडी नेता म्हणजेच सागर शिंदे याने बिग बॉस ५ चा विजेता सूरज चव्हाण याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फार कमी प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमानंने २४ लाखांची कमाई केली मात्र सहाव्या दिवशीही ही कमाई तितकीच राहिली आहे. सूरज बिग बॉस मध्ये असल्यापासूनच त्याच्या अनेक हटके डायलॉगने प्रेक्षकांची मने जिंकली. 'झापुक झुपूक' हा डायलॉग सुरजचा नसून सागर शिंदेचा असल्याचं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सागर शिंदे याचं म्हणणं आहे. सागरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट करत दिली आहे.

काय म्हणाला सागर शिंदे ?

सागर शिंदे म्हणाला " लहानपनापासूनच 'झापुक झुपूक हा शब्द मी वापरत आलो आहे. २०२२ मध्ये 'झापुक झुपूक' हा शब्द मी एका व्हिडीओ मधून पुढे आणला. त्यानंतर २०२३ मध्ये लोकांनी तो डायलॉग उचलून धरला. तसेच सुरजनेही तो त्याच्या व्हिडीओमध्ये वापरण्यास सुरुवात केली. सुरजने बिग बॉसमध्ये हा शब्द वापरल्यामुळे जास्तच चर्चेत आला. माझा हा डायलॉग वापरून सूरज चव्हाण मोठा झाला आहे. हा त्याचा नाही तर माझा डायलॉग आहे. मी हा शब्द रजिस्टर देखील केला आहे." असं सागर शिंदेने त्याच्या रावडी नेता या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ पोस्ट करत सांगितले आहे.

Comments
Add Comment