
७ शिक्षकांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; मुख्य आरोपीला अटक
रायपूर : छत्तीसगढ येथील विलासपूर जिल्ह्यात धर्मांतराचा (Religion convert) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिलासपूर जिल्ह्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) कॅम्पदरम्यान हिंदू विद्यार्थ्यांवर नमाज पठण करण्याची जबरदस्ती केल्याचा प्रकार घडला आहे. कॅम्पदरम्यान प्राध्यापकाकडून विद्यार्थ्यांवर धर्मांतराचा प्रकार सुरु असून विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत प्राध्यपकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ७ शिक्षकांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे.

दुबई : दुबईत घरकामाची नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एक एजन्सी हाऊसकीपिंग अर्थात घरकामासाठी वर्षाला ८४ लाख रुपये पगार देण्यास ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत कोटा पोलिस स्टेशन हद्दीतील शिवराय गावातील शिबिरात १५९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या १५९ विद्यार्थ्यांपैकी फक्त ४ विद्यार्थी मुस्लिम होते; परंतु विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडले. विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि तक्रार दाखल केली. दिलीप झाल असे प्राध्यापकाचे नाव असून बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला आज अटक करण्यात आली. त्याचबरोबर सहा प्राध्यापकांसह एका विद्यार्थ्यावर भारतीय न्याय संहिता आणि छत्तीसगड धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत धर्माच्या आधारावर द्वेष पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीएसपी रश्मीत कौर चावला यांनी सांगितल्यानुसार, या घटनेसंदर्भात २६ एप्रिल रोजी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे.
हिंदू संघटना आक्रमक
या घटनेप्रकरणी हिंदू संघटनांनीही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. बिलासपूरचे एसपी रजनीश सिंह यांनी चार सदस्यांची समिती स्थापन केली होती. शहर अधीक्षक (कोतवाली) अक्षय सबादरा यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी करण्यात आली. समितीच्या अहवालाच्या आधारे झा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इतर लोकांविरुद्धही चौकशी सुरू असल्याचे चावला यांनी सांगितले.