Google News : गुगलवर 'हे' सर्च केले तर होईल तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने कठोर कारवाई सुरू केली आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. संशयितांची तपासणी करुन त्यात पाकिस्तानी आढळले आणि ते देश सोडत नसतील त्यांची हकालपट्टी करण्याचे काम सुरू आहे.


दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रचार - प्रसार टाळण्यासाठी अनेक सोशल मीडिया अकाउंट पुढील सूचनेपर्यंत ब्लॉक करण्यात आली आहेत. या वातावरणात गूगलवर भलतेसलते शब्द टाकून सर्च करणे धोक्याचे आहे. हे सर्च तुम्हाला थेट तुरुंगात ढकलू शकते.



कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करू नये ?


बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ बनवण्याच्या पद्धतीबद्दल शोधत असाल तर पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. जर तुम्ही बॉम्ब किंवा कोणत्याही प्रकारची स्फोटक सामग्री बनवण्याच्या पद्धतीबद्दल सर्च केले तर त्यामुळे तुम्ही सुरक्षा एजन्सींच्या रडारवर येऊ शकता. या गोष्टी संवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत, सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात आणि अटक देखील करू शकतात.


तुम्ही जर शस्त्रे आणि दहशतवादी संघटनेबाबत सर्च करत असाल तर तुम्ही दहशतवाद्यांच्या विचारसरणीबाबत सर्च केले, दहशतवादी कशी तयारी करतात, याचे व्हिडीओ गुगलवर पाहत असल्यास सुरक्षा एजन्सी तुम्हाला संशयित मानू शकतात. त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Comments
Add Comment

मुंबईत दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना अटक

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) मुंबई युनिटने वडाळा टीटी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेचा हा प्लॅटफॉर्म ८० दिवस राहणार बंद

मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईत असलेला छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी

मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत

राज्याला पावसाचा दणका; मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) प्राप्त झालेल्या पूर्वामानानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामाला येणार गती

मुंबई : लिंक रोडचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या कामाच्या अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात

प्रभादेवी पूलबाधितांचे नजीकच्या परिसरातच होणार पुनर्वसन

मुंबई : शिवडी ते वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रभादेवी द्विस्तरीय पुलाच्या कामात