Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

पाकिस्तानकडून सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताकडून चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानकडून सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताकडून चोख प्रत्युत्तर
श्रीनगर : पाकिस्तानने सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. भारतीय चौकी - पहारे यांना लक्ष्य करुन पाकिस्तानने गोळीबार केला. भारताकडून सलग सातव्या रात्री पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तणाव वाढू लागल्यापासून सातत्याने पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे आणि भारताकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.
पाकिस्तानने सातव्या रात्री म्हणजेच बुधवार - गुरुवार दरम्यान रात्री कुपवाडा, उरी आणि अखनूरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि भारतीय चौकी - पहारे यांना लक्ष्य करुन गोळीबार केला. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. हलक्या शस्त्रांद्वारे पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता. भारताने पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. भारत - पाकिस्तान सीमेवर गोळीबार सुरू असल्यामुळे दररोज कित्येक तास स्थानिकांना बंकरमध्येच वास्तव्य करावे लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारी योजनेत सीमेजवळच्या शेकडो गावांमध्ये दर्जेदार बंकर बांधण्यात आले आहेत. या बंकरमध्ये नागरिक सुरक्षित आहेत.
Comments
Add Comment