Thursday, May 1, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

उष्णतेचा कहर होणार! तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा!

उष्णतेचा कहर होणार! तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा!

मुंबई : देशातल्या विविध भागात उष्णतेचा कहर होणार असून तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच १ मे ते २ जून २०२५ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या काळात सूर्यप्रकाशात फिरल्याने गुदमरल्यासारखे वाटणे, घाम न येणे, उलट्या, चक्कर येणे, उष्माघात (हीट स्ट्रोक) होऊ शकतो. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.


घरी घ्या ही खबरदारी:

  • खोलीचा दरवाजा आणि खिडक्या थोड्या उघड्या ठेवा – हवा खेळती राहील.

  • मोबाईल फोन अत्यंत गरजेपुरता वापरा – उष्णतेने बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता!

  • शक्य असल्यास दर दोन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या.

  • घरातील AC २४-२५°C वर ठेवा – जास्त थंडपणा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.


शरीर थंड ठेवण्यासाठी हे प्या:

  • दही, ताक, उसाचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी

  • थंड पाणी – दिवसात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्या

  • गरम व तेलकट पदार्थ, चहा-कॉफी टाळा


गाडी चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा:

  • सकाळी गाडीने प्रवास टाळा

  • गाडीतील गॅस सिलिंडर, लाइटर, परफ्यूम, कोल्ड्रिंक्स, बॅटर्‍या काढून टाका

  • कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा (व्हेंटिलेशनसाठी)

  • कारचे टायर जास्त फुगवू नका – उष्णतेने फुटण्याचा धोका

  • इंधन टाकी पूर्ण भरू नका, संध्याकाळी इंधन भरा


सर्पदंश आणि विंचवांपासून सावधगिरी:

  • साप, विंचू उष्णतेमुळे थंड जागांचा शोध घेतात

  • बागेत, अंगणात आणि घरात तपासणी करा

  • शक्य असल्यास रात्री उघड्या पायाने फिरणे टाळा


वीज आणि इंधन सुरक्षेबाबत खबरदारी:

  • गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नका

  • AC फक्त गरज असेल तेव्हाच वापरा

  • घरातील वीज मीटर आणि वायरिंग ओव्हरलोड होणार नाही याची खात्री करा

Comments
Add Comment