Mary Kom: तब्बल २० वर्षांनंतर बॉक्सर मेरीकॉमचा घटस्फोट, प्रेम प्रकारणांच्या अफवांवर सोडले मौन

भारतीय ऑलिंपिक पदक विजेती मेरीकॉम आणि तिचा पती करूंग ओन्लर यांचे वैवाहिक नातं संपुष्टात आलं आहे. हा घटस्फोट २० डिसेंबर २०२३ रोजी परस्पर संमतीने झाला आहे. घटस्फोटानंतर सुमारे १६ महिन्यांनी त्यांनी ही घोषणा केली आहे. मेरीकॉमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, अनेकांनी अफवा पसरवण्यास जेव्हा सुरुवात केली तेव्हा तिने या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.


मेरीकॉम आणि तिचा व्यावसायिक सहकारी हितेश चौधरी यांच्यातील प्रेम संबंधांच्या चर्चा पसरत असताना, मेरीकॉमने तिच्या वकिलाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनाद्वारे ही पुष्टी केली. मेरीकॉमने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर करत, पती करूंग ओंखोलरसोबत कायदेशीर घटस्फोट झाला असल्याची माहिती दिली. याबरोबरच तिने कोणत्याही प्रेमसंबंधाचा स्पष्टपणे इन्कार केला आहे.





मेरीकॉमने प्रेम प्रकरणाच्या अफवांवर सोडले मौन


मेरीकॉमचे बॉक्सिंग फाउंडेशन व्यवसाय भागीदार आणि अध्यक्ष हितेश चौधरी यांच्याशी प्रेमसंबंध असल्याची अफवा पसरली होती. तसेच, तिच्यावर दुसऱ्या बॉक्सरच्या पतीसोबत संबंध असल्याचे आरोपही होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर, मेरी कोमने तिच्याकडून जारी केलेली कायदेशीर नोटीस शेअर केली. ज्यात हितेश चौधरी बरोबरच्या प्रेम संबंधांच्या चर्चा अफवा असल्याचे सांगत, म्हंटले की, "ओंखोलरपासून वेगळे होणे हे परस्पर संमतीने होते आणि ते आम्ही जवळजवळ दोन वर्षांपासून वेगळे राहत आहोत."निवेदनानुसार, ती हितेश चौधरी किंवा इतर कोणाशीही डेट करत असल्याच्या अफवा पूर्णपणे निराधार आणि खोट्या आहेत. निवेदनात मीडिया प्लॅटफॉर्मना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आणि चुकीची माहिती पसरवणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 

मेरीकॉमने चाहत्यांना केले आवाहन


जर सूचनांचे पालन केले नाही तर बदनामी आणि गोपनीयता कायद्यांचे उल्लंघन यासह कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा त्यात देण्यात आला आहे.


२०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये मेरी कोमने कांस्यपदक जिंकले. याशिवाय, ४२ वर्षीय बॉक्सरने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ६ सुवर्णपदकांसह ८ पदके जिंकली आहेत. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ६ सुवर्णपदके जिंकणारी ती जगातील एकमेव महिला बॉक्सर आहे. त्यांना २००६ मध्ये पद्मश्री, २०१३ मध्ये पद्मभूषण आणि २०२० मध्ये पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या