Homemade Mask : सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी 'हे' घरगुती मास्क आजच ट्राय करा

मुंबई : आपली त्वचा म्हणजे आपल्या सौंदर्याचा आरसा. पण प्रदूषण, अनहेल्दी डायेट, आणि सततच्या धावपळीत सेन्सिटिव्ह स्किनचं नुकसान होण्याचा धोका वाढतो. मुरुमं, पुरळं यासारख्या समस्या तर सतत त्रास देतात. यावर उपाय म्हणून चार सोप्पे आणि घरच्या घरी बनवता येणारे फेस मास्क पुढीलप्रमाणे :-


१. घरच्या घरी बनवता येणारा सगळ्यात सोपा आणि छान फेस मास्क म्हणजे केळीचा फेस मास्क.


यासाठी अर्ध मॅश केलेलं केळं, पाव कप शिजवलेलं ओटमील, एक अंडं आणि अर्धा चमचा मध – एवढंच लागेल. सगळं एकत्र करून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि १५–२० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.... केळं आणि अंड्यांमुळे त्वचेला नॅचरल ग्लो मिळतो.



२. दुसरा ओटमील आणि अंड्याचा फेस पॅक...


अंड्याचा फक्त पांढरा भाग फेटून घ्या, त्यात एक चमचा ओटमील आणि मध मिसळा. चेहरा आणि मानेला लावा, वाळल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. हा पॅक त्वचेला सौम्य एक्सफोलिएशन आणि उत्तम हायड्रेशन देतो.


३. तिसरं म्हणजे कॅमोमाइल आणि कॉर्न फ्लोअर स्क्रब...


यात कॅमोमाइल चहा थंड करून घ्या. त्यात मिल्क पावडर आणि कॉर्नमील मिसळा. हा स्क्रब चेहऱ्यावर १५ मिनिटं राहू द्या आणि नंतर धुवा. कॅमोमाइलच्या गुणधर्मांमुळे त्वचेतील पुरळं आणि सूज लवकर बरी होते.


४. चौथा कोरफड आणि काकडीचा फेस मास्क...


यामध्ये किसलेली काकडी आणि एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा. थंडावा आणि हायड्रेशन मिळवायला या मास्कचा उपयोग करा. हे सगळे फेस मास्क सहज घरच्या घरी बनवता येतात आणि सेंसिटिव्ह स्किनसाठी अगदी परफेक्ट आहेत.

Comments
Add Comment

'World Smile Day'- "जागतिक स्मित हास्य दिवस"...

"जागतिक स्मित हास्य दिवस" का साजरा केला जातो ? हे सविस्तर जाणून घ्या धकाधकीमुळे अनेकजण प्रचंड त्रासले असतात.

WORLD SMILE DAY : स्मितहास्य आरोग्याची गुरुकिल्ली

हसताय ना, हसायलाच पाहिजे... म्हणणारा निलेश साबळे असो कि महाराष्ट्राची हास्यजत्रा मधले कलाकार... आपल्या तणावपूर्ण

एकाग्रता वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स !

मुंबई : आजचा काळ म्हणजे वेगवान जीवनशैली आणि सततची स्पर्धा. या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण

पारंपरिकतेला फॅशनचा ट्विस्ट

दिवस सणांचे भरपूर शॉपिंगचे ... दिवाळी अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली आहे. नवरात्र संपत आलीय आणि दिवाळीच्या तयारीची

जागतिक शाकाहारी दिन

आज १ ऑक्टोबर. जागतिक शाकाहार दिन. जगभर आजच्या दिवशी शाकाहार दिन साजरा करतात. शाकाहारी लोकं काय खाऊन प्रोटिन्स

'व्हिटॅमिन डी'ची कमतरता, किशोरवयीन मुलांमध्ये अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका

मुंबई : भारतातील किशोरवयीन मुलानंमध्ये 'व्हिटॅमिन डी' आणि 'झिंक'ची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसते. या कमतरतेमुळे