Vaibhav Suryavanshi : १४ वर्षाचा वादळी शतकवीर! वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला!

क्रिकेट हा केवळ खेळ नाही तो आहे विक्रमांचा उत्सव! पण काही विक्रम हे काळाच्या चौकटीत बसत नाहीत… ते इतिहास घडवतात. आणि यंदाच्या आयपीएल मध्ये, असाच इतिहास रचला आहे अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने... कोण आहे हा वैभव... चला जाणून घेऊ या सविस्तर माहिती...



बिहारच्या पाटण्यातून आलेला हा चिमुकला राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील होतो आणि आपल्या तिस-याच सामन्यात ३५ चेंडूत शतक ठोकून क्रिकेटविश्व हादरवतो... ७ चौकार… ११ षटकार… आणि अवघ्या १४ वर्षांत ही कामगिरी... असं काही फक्त प्रतिभाच नाही, तर जिद्द, मेहनत आणि नैसर्गिक खेळातील कसब याच्या जोरावरच शक्य होतं. वैभवच्या या यशामागे आहे संघर्षांची दीर्घ कहाणी. त्याच्या वडिलांनी मुलाच्या स्वप्नासाठी आपली जमीन विकली… पाचव्या वर्षी क्रिकेट हातात घेतलेला वैभव... अकादमीमध्ये इतर मुलं जिथं १५० चेंडू खेळायची, तिथं हा मुलगा ६०० बॉल्स खेळायचा.



१२ व्या वर्षी विनू मंकड ट्रॉफीमध्ये ४०० धावा, अंडर १९ सामन्यात त्रिशतक, विजय हजारे, आशिया कप, रणजी सगळीकडे त्याचा दबदबा. आणि या सा-या प्रवासात त्याला दिशा दिली भारताचा व्हेरी व्हेरी स्पेशल फलंदाज लक्ष्मण आणि द वॉल राहुल द्रविड यांनी. द्रविड आणि लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या खेळाला दिशा मिळाली…


आयपीएलपूर्वी लक्ष्मणने त्याची द्रविडकडे शिफारस केली आणि राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल १ कोटी १० लाखांना खरेदी केलं.. त्याच्या प्रतिभेवर विश्वास ठेवणारे आईवडील, लक्ष्मण सर आणि द्रविड सर हे खरे पारखी ठरले. आज त्याची तुलना सचिनशी होते, पण तो अजून प्रवासाच्या सुरुवातीला आहे. पुढं अनेक कसोट्या आहेत, संधी आहेत… पण सातत्य, संयम आणि जमिनीवर राहण्याची शिस्त हीच त्याची खरी कसोटी ठरणार आहे.


१४ वर्षांचा हा मुलगा आज क्रिकेटच्या व्यासपीठावर चमकतोय, कारण त्याने आपल्या मेहनतीचा दिवा विझू दिला नाही… आणि त्याच्या झळाळत्या खेळाला द्रविड-लक्ष्मणसारखे रत्नपारखी लाभले. विक्रमी खेळी आली आणि गेली, पण वैभवची खरी कसोटी आता सुरू झाली आहे. तो खेळात टिकेल की नाही, हे येणारा काळ सांगेल… पण आज मात्र, आपल्याला हे नक्की सांगता येईल, क्रिकेटच्या आकाशात एक नवा तारा उगम पावलाय. त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी!

Comments
Add Comment

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर