

सैन्य दलांत तीन महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने तातडीने संरक्षणाशी संबंधित अनेक निर्णय घेतले आहेत. भारत आणि फ्रान्सच्या सरकारमध्ये ...
शर्मा यांच्या नावाचा विचार नॉर्दन आर्मी कमांडचे प्रमुख म्हणून वरिष्ठ पातळीवर काही दिवसांपासून सुरू होता. अखेर जबाबदारी सोपवण्याचा औपचारिक निर्णय २८ एप्रिल रोजी घेण्यात आला. याआधी पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत श्रीनगरला पोहोचले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडे बोल, संयुक्त राष्ट्रांमध्ये घेतली हजेरी
संयुक्त राष्ट्रे : अमेरिका, ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी मागील तीन दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे घाणेरडे काम करत आहोत. ही एक चूक होती आणि ...
कोण आहेत लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा ?
लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे भारतीय सैन्यातील एक अनुभवी अधिकारी आहेत. ते मागील तीन दशकांपेक्षा जास्त काळ लष्करात आहेत. श्रीलंकेतील भारताच्या शांतीसेनेचे ऑपरेशन पवन, सियाचीन ग्लेशियर येथील ऑपरेशन मेघदूत, काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात राबवलेले ऑपरेशन रक्षक, संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेले सीमेवरील नियुक्तीबाबतचे ऑपरेशन पराक्रम अशा अनेक आव्हानात्मक ऑपरेशन्समध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.
नॉर्दन आर्मी कमांडकडे असलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
नॉर्दन आर्मी कमांड पाकिस्तानसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच नियंत्रण रेषेवर आणि चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लक्ष ठेवते. पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नॉर्दन आर्मी कमांडच्या कामाचा ताण वाढला आहे.
प्रतीक शर्मा यांची कामगिरी
प्रतीक शर्मा यांनी यापूर्वी लष्करी मुख्यालय, नवी दिल्ली येथे नव्याने स्थापन झालेल्या माहिती संचालनालयात डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ), मिलिटरी सेक्रेटरी ब्रँच आणि अलिकडेच डायरेक्टर जनरल इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणून वरिष्ठ पदांवर काम केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच ते लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत श्रीनगरला पोहोचले होते. यातूनच्या त्यांच्या धोरणात्मक विचारसरणीचा आणि तयारीचा अंदाज येतो.