Bhagyashree Borse : 'ही' मराठमोळी मुलगी दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत चित्रपटात झळकणार!

मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे नाव 'किंगडम' असे आहे. त्याचा हा चित्रपट तामिळ, हिंदी आणि तेलगू या भाषेत प्रदर्शित केला जणार आहे. या चित्रपटाचा टीझर आताच काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला आहे.
ज्युनिअर एनटीआरने तेलुगू, रणबीर कपूरने हिंदी तर अभिनेता सूर्याने तमिळ सिनेमाच्या टीझरसाठी आवाज दिला आहे. उद्या सिनेमाचा प्रोमो रिलीज होणार आहे.या चित्रपटात विजयने ज्या अभिनेत्रीसोबत काम केले आहे ती अभिनेत्री छत्रपती संभाजीनगरची असून मराठी कुटुंबात जन्माला आली आहे. कोण आहे ही अभिनेत्री?


बोरसेंची भाग्यश्री बनली विजय देवरकोंडाची हिरोईन!


विजय देवरकोंडासोबत 'किंगडम'मध्ये झळकणारी ही अभिनेत्री आहे भाग्यश्री बोरसे (Bhagyashri Borse). भाग्यश्रीचा जन्म १९९९ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. भाग्यश्रीच्या जन्मानंतर काही वर्षात तिचं कुटुंब नायजेरियाला शिफ्ट झालं. तिथे तिच्या वडिलांना चांगली नोकरी मिळाली. नायजेरियातील 'लेगोज' शहरात तिने शालेय शिक्षण घेतलं. सात वर्ष नायजेरियात राहिल्यानंतर ती मुंबईत आली. इथे तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. शिक्षण घेतानाच ती मॉडेलिंगही करत होती. तिचा कॅमेरा प्रेझेन्स चांगला असल्याने अनेकांनी तिला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. भाग्यश्रीने काही जाहिरातींमध्ये काम केलं. नंतर ती बॉलिवूडमध्ये आली. भाग्यश्रीने 'यारियां' आणि 'चंदू चॅम्पियन' मध्ये काम केलं आहे.

हिंदीत नशीब आजमावल्यानंतर भाग्यश्री साऊथमध्ये शिफ्ट झाली. गेल्या वर्षीच ती रवी तेजासोबत 'मिस्टर बच्चन' सिनेमात झळकली. लवकरच तिचा 'कांता' सिनेमा येणार आहे ज्यामध्ये ती दुलकर सलमानसोबत दिसणार आहे. भाग्यश्रीच्या वडिलांना सिनेमांचं वेड आहे. वडिलांसोबत बसून तिने राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांचे सिनेमे पाहिले आहेत. तेव्हापासूनच तिला सिनेमाविषयी आकर्षण होतं. आता 'किंगडम'मध्ये भाग्यश्रीला पाहण्याची चाहत्यांचा उत्सुकता आहे. पुढील महिन्यात 'किंगडम' रिलीज होणार आहे. सध्या भाग्यश्री नवी नॅशनल क्रश म्हणून उदयास येत आहे.

 

 
Comments
Add Comment

Dhurandhar 2 : अभिनेत्री अमिषा पटेलनं धुरंधर २ सिनेमाचं केलं कौतुक, बॉलिवूड इडंस्ट्रीला दिला 'हा' सल्ला

धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांपासून अनेक कलाकारांनी या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे.

Dhurandhar 2 : बॉक्स ऑफिसवर धुरंधर २ चा धूमाकूळ , लवकरच १००० कोटींचा टप्पा गाठणार

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. लवकरच धुरंधर २ सिनेमा आणखीन नवा विक्रम करणार

महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची; विचार करायला भाग पाडणारी नाट्यकृती चर्चेत

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ या शीर्षकाने सादर झालेल्या नव्या नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू

मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार

मुंबई : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत

लवकरच केदार शिंदेंचा 'हा' स्त्रीप्रधान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मराठी सिनेविश्वात स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळीच ओळख मिळवून देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा

नवऱ्याचं कौतुकचं नाही, अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मिडियावर ट्रोल

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर 2 सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत