इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. भारताचा पवित्रा बघून पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी आणि लष्करी अधिकारी आपल्या कुटुंबियांना आणि जवळच्या नातलगांना परदेशी पाठवून दिले आहे. अनेकांनी आपली खासगी संपत्ती परदेशी बँकांतून हस्तांतरित (ट्रान्सफर) केली आहे. तर काही लष्करी अधिकाऱ्यांनी वेगवेगळी कारणं पुढे करुन नोकरी करण्यास असमर्थ असल्याचे सांगायला आणि राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढू लागला आहे. असीम मुनीरचे कुटुंबही देश सोडून गेले आहे. याशिवाय बिलावल भुट्टो यांचे कुटुंबही देश सोडून गेले आहे.
सलग चौथ्या रात्री सीमेवरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर
पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जबाबदार असलेल्या सर्व देशद्रोह्यांना कल्पनाही करता येणार नाही एवढी कठोर शिक्षा देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा ऐकल्यापासून पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जास्तीत जास्त ४८ तासांत कापणी करुन शेत साफ करा, शेतकऱ्यांना BSF चा आदेश
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला झाला. यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख पुढचे काही दिवस कोणालाच दिसले नाही. यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर बेपत्ता असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अखेर पाकिस्तानच्या पीएमओच्या एक्स हँडलवरुन जनरल असीम मुनीर कार्यरत आहेत हे सांगण्यासाठी एक पोस्ट करण्यात आली. पाकिस्तानच्या सैन्यात तर भारताच्या हल्ल्याविषयी आधीपासूनच भीती आहे. पाच हजारांपेक्षा जास्त सैनिकांनी तडकाफ़की राजीनामा दिला आहे. यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढू लागला आहे.
याआधी काकुल भागातील पाकिस्तान मिलिटरी अकादमी (पीएमए) येथे कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडला संबोधित करताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर द्विराष्ट्र या संकल्पनेवर भाष्य केले होते. द्विराष्ट्र म्हणजे हिंदू आणि मुसलमान या दोन धर्मांसाठी असलेली दोन स्वतंत्र राष्ट्र. मुनीर यांच्या या भूमिकेमुळेच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.