अलिबाग : वणव्यांमुळे रायगड जिल्ह्यातील वनसंपदा सध्या धोक्यात आली आहे. पाच वर्षांत एक हजार वणवे लागले असून, त्याची ३ हजार ७१ हेक्टरवरील वनक्षेत्राला वणव्यांची झळ बसली आहे. या वणव्यातील ९० टक्के वणवे हे मानवनिर्मित असून, वणव्यांमुळे नैसर्गिक साधन संपत्तींची, हानी होत आहे. त्याचबरोबर जंगलातील पशुपक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात ३५ हजार हेक्टर खासगी, तर १ लाख ७ हजार हेक्टर सरकारी वनक्षेत्र आहे. यात माथेरानसह फणसाड आणि कर्नाळा अभयारण्य परिसराचाही समावेश आहे. अत्यंत दुर्मीळ वन्य प्रजाती येथे वास्तव्य करतात. हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला जंगलांना वणवे लागण्याचे प्रकार सुरू होतात. यामुळे वनसंपत्तीची मोठी हानी होते. मागील पाच वर्षांचा विचार करता, २०१८-१९ मध्ये वणव्याच्या जिल्ह्यात २०७ घटना घडल्याने ८८७ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले. २०१९-२० मध्ये वणव्याने तब्बल १७४ घटना घडल्या. यात ५७१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. २०२०-२१ मध्ये डिसेंबर अखेर वणव्याने १३४ घटनांची नोंद झाली. यात ३०६ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील वनसंपदा बाधित झाली. २०२१-२२ मध्ये ३५५ वणवे लागल्याने त्यात ७०३ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले. २०२२-२३ मध्ये ३५५ वणवे लागले, तर २०२३-२४ मध्ये १५५ वणवे लागले. ज्यात २८६ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले, तर २०२४-२५ मध्ये ९५ वणवे लागण्याच्या घटना समोर आल्या, ज्यात २०० हून अधिक हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले आहे.
अनियंत्रित वणवे आता जंगलालगतच्या गावात शिरण्याच्या घटना मागील काही वर्षांत समोर आल्या आहेत. वणव्यांमुळे प्रदेशनिष्ठ वनस्पती धोक्यात येत आहे. यात प्रामुख्याने गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी,
रानआले, सोनजाई, गजकर्णिका, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, कुळी कापुरली संजीवनी, सर्पगंधा, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे, तर घुबड, चंडोल, रॉबिन रानकोंबड्या, मोर, सापांच्या प्रजाती गवतावरील कीटक, उंदीर, भेकरे यांसारख्या पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पूर्वी मुबलक प्रमाणात आढळणारे वन्यजीव आता दिसेनासे होत चालले आहेत. कोकणात १८४ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही वणव्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत.
वणव्यामुळे पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट होतो, एकदा अधिवास नष्ट झाल्यास वनजीवांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होते. त्यामुळे वन्यजीव या परिसरातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सातत्याने लागणारे वणवे रोखणे गरजेचे आहे. लोकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन करणे आणि वणवे रोखण्यासाठी लोकसहभाग वाढवणे, आवश्यक आहे अन्यथा कोकणातील सदाहरीत वनांचे अच्छादन नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.
स्थानिकांमध्ये असलेला गैरसमजातून हे वणवे लावले जातात. जंगलांना वणवे लावले की, पुढील वर्षी जंगलात चांगले गवत उगवते. हे गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणून दरवर्षी उन्हाळ्यात जंगलांना आगी लावल्या जातात. दुसरीकडे सरपणाला लाकूड मिळावे, म्हणूनही वणवे पेटवले जातात. वणव्यांमुळे झाडे सुकतात आणि पर्यायाने हे लाकूड सरपणासाठी तोडली जातात. कधी कधी शिकारीसाठीही हे वणवे लावले जातात. वणवा लागल्याने वन्यजीव आगीच्या विरुध्द दिशेने पळण्यास सुरूवात करतात. याचवेळी दबा धरून बसलेले शिकारी वन्यजीवांची सावज टिपतात.
जिल्ह्यात वनक्षेत्र खूप जास्त आहे. पण त्या तुलनेत वनविभागाकडे असणारा कर्मचारी वर्ग अतिशय कमी आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी वर्गाचा वापर करून वनसंवर्धनाचे काम केले जात आहे. पण त्याला मर्यादा पडतात. त्यामुळे वणवे रोखणे जिकीरीचे काम ठरते. अनियंत्रित वणव्यांना रोखण्यासाठी अलिबागच्या वन विभागाने फायर ब्लॉ या यंत्राचा वापर सुरू केला आहे. उपवनसंरक्षक अलिबाग याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ११ परिक्षेत्रांना फायरब्लॉ ही अद्यावत यंत्रे देण्यात आली आहेत. या यंत्राद्वारे फायर लाईन मारणे, आग विझवणे यासारखी कामे जलदगतीने केली जातात. या शिवाय हॅलो फॉरेस्ट सारखी शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या हेल्पलाईनची सुरुवात केली आहे. मात्र तरीही वणवे लागण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.
वणव्यांवर तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी वनविभागातर्फे सतत ऑनलाईन देखरेख केली जाते. वनविभागाच्या संकेत स्थळावर रिअल टाइम वनक्षेत्राचा अहवाल मिळतो. त्यात कुठे वणवा लागला आहे, त्याचे स्वरूप किती, हे संबंधित विभागाला समजते. त्याप्रमाणे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सुचना करून वणवा विझविण्याची तत्काळ कार्यवाही करतात. – राहुल पाटील, उपवनसंरक्षक, अलिबाग
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…
फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…