RR vs GT, IPL 2025: वैभवच्या धावांचे वादळ, राजस्थानचा गुजरातवर ८ विकेट राखत विजय

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत विजय मिळवला आहे. गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर राजस्थानने हे आव्हान १५.५ षटके आणि ८ विकेट राखत पूर्ण केले.


राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला वैभव सूर्यवंशी.  वैभवने ३८ बॉलमध्ये ७ चौकार आणि ११ षटकारांच्या जोरावर १०१ धावा ठोकल्या. सलामीवीर यशस्वी जायसवालनेही ७० धावांची जबरदस्त खेळी केली. यामुळेच राजस्थानला १५.५ षटकांत हे इतके मोठे आव्हान गाठता आले.

तत्पूर्वी टॉसनंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या गुजरातची सुरूवात शानदार राहिली. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने प्रत्येक गोलंदाजाला झोडून काढले. गिलने आक्रमक फलंदाजी केली आणि २९ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. दुसरीकडून सुदर्शननेही चौकार-षटकारांचा पाऊस केला. १० षटकांत गुजरातची धावसंख्या बिनबाद ९२ होती. ११व्या षटकांत गुजरातला पहिला झटका बसला तो म्हणजे साई सुदर्शन बाद झाला. त्याने ३९ धावांची खेळी केली.


यानंतर बटलर आणि गिलने मोर्चा सांभाळला. दोघांनी जोरदार फलंदाजी केली. १५व्या षटकांत गुजरातची धावसंख्या दीडशेपार गेली. १७व्या षटकांत गिलची विकेट पडली. गिलने ५० बॉलमध्ये ८४ धावांची खेळी केली. यानंतर बटलरनेही अर्धशतक ठोकले. याच्या जोरावर गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान ठेवले.

Comments

megha malik    April 29, 2025 02:41 PM

राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत शानदार विजय मिळवला! 💥 वैभव सूर्यवंशीच्या तुफानी शतकाने RR ने २१० धावांचा मोठा टार्गेट १५.५ षटकारात पूर्ण केला! 😲🔥 यशस्वी जायसवालनेही दमदार ७० धावा केल्या! 👏 गुजरातच्या शुभमन गिलने ८४ धावा केल्या, पण RR च्या आक्रमक खेळीपुढे तो कमी पडला! 🏏

Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय