RR vs GT, IPL 2025: वैभवच्या धावांचे वादळ, राजस्थानचा गुजरातवर ८ विकेट राखत विजय

Share

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत विजय मिळवला आहे. गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर राजस्थानने हे आव्हान १५.५ षटके आणि ८ विकेट राखत पूर्ण केले.

राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला वैभव सूर्यवंशी.  वैभवने ३८ बॉलमध्ये ७ चौकार आणि ११ षटकारांच्या जोरावर १०१ धावा ठोकल्या. सलामीवीर यशस्वी जायसवालनेही ७० धावांची जबरदस्त खेळी केली. यामुळेच राजस्थानला १५.५ षटकांत हे इतके मोठे आव्हान गाठता आले.

तत्पूर्वी टॉसनंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या गुजरातची सुरूवात शानदार राहिली. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने प्रत्येक गोलंदाजाला झोडून काढले. गिलने आक्रमक फलंदाजी केली आणि २९ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. दुसरीकडून सुदर्शननेही चौकार-षटकारांचा पाऊस केला. १० षटकांत गुजरातची धावसंख्या बिनबाद ९२ होती. ११व्या षटकांत गुजरातला पहिला झटका बसला तो म्हणजे साई सुदर्शन बाद झाला. त्याने ३९ धावांची खेळी केली.

यानंतर बटलर आणि गिलने मोर्चा सांभाळला. दोघांनी जोरदार फलंदाजी केली. १५व्या षटकांत गुजरातची धावसंख्या दीडशेपार गेली. १७व्या षटकांत गिलची विकेट पडली. गिलने ५० बॉलमध्ये ८४ धावांची खेळी केली. यानंतर बटलरनेही अर्धशतक ठोकले. याच्या जोरावर गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान ठेवले.

Recent Posts

ही भारतासाठी सुवर्णसंधीच …

अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…

24 minutes ago

लिंक मिडल ईस्ट कंपनी, दुबई

श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला.  आईला शिक्षणाची खूप…

55 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…

1 hour ago

मत्स्योत्पादनामध्ये देशात अव्वल राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता – केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह

मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…

3 hours ago

जात पात बाजूला ठेऊन मेहनत करून आपली उन्नती करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…

4 hours ago

पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफी

पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…

5 hours ago