नवी दिल्ली : भारत सरकारने काही वर्षांपूर्वी हवाई दलाकरिता ३६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्स सरकारसोबत केला. आता केंद्र सरकारने नौदलासाठी २६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्स सरकारसोबत केला आहे. दिल्लीत भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार आणि फ्रान्सचे राजदूत यांनी करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
पाकिस्तानच्या सैन्यात पसरली अस्वस्थता, लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. भारताचा पवित्रा बघून ...
सलग चौथ्या रात्री सीमेवरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर
श्रीनगर : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारुन ठार केले. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू ...
राफेल विमानांच्या खरेदीसाठी भारत सरकारने फ्रान्स सरकारशी सलग दुसऱ्यांदा थेट करार केला आहे. यावेळी मरीन कॉम्बॅक्ट राफेल विमानांची खरेदी भारत करणार आहे. यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये ६३ हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. फ्रान्सकडून येणार असलेल्या २६ राफेल विमानांचा ताफा आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेवर तैनात केला जाणार आहे.
फ्रान्सचे हवाई दल आणि नौदल राफेल विमानांचा वापर करते. भारतातही हवाई दल राफेल विमानांचा वापर करत आहे. आता भारतीय नौदलासाठीही राफेल विमानांचा ताफा येणार आहे. भारतीय नौकांच्या रचनेचा विचार करुन नौदलासाठीच्या राफेलमध्ये थोडे बदल केले जाणार आहेत. या बदलांमुळे नौकेवरील मर्यादीत जागेचा वापर करुन उड्डाण करणे किंवा उतरणे हे दोन्ही राफेल विमानांना शक्य होणार आहे. भारतीय नौकांमध्ये धावपट्टी एका बाजूस किंचित चढण असलेली अशी तिरपी असते. या रचनेस अनुकूल असे बदल राफेलमध्ये केले जाणार आहेत.
हवाई दलाची ३६ आणि नौदलाची २६ अशी एकूण ६२ राफेल लढाऊ विमानं लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात असतील.