Wednesday, May 21, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Breaking News : आधार, पॅन, वाहन परवाना एकाच ठिकाणी होणार अपडेट

Breaking News : आधार, पॅन, वाहन परवाना एकाच ठिकाणी होणार अपडेट

नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच ठिकाणी अपडेट करण्याची सुविधा लवकरच मिळणार आहे. केंद्र सरकार त्यासाठी एक डिजिटल प्रणाली लॉन्च करणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व ओळखपत्र मिळणार आहे. बदल करणे आणि नवीन ओळखपत्र घरपोच मिळवणे ही सर्व कामे या पोर्टलवर होणार आहे. केंद्र सरकार एक पोर्टल बनवत आहे.


त्यामुळे एकाच ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी अपडेट करता येणार आहे. त्यात नाव बदलणे, मोबाइल क्रमांक अपडेट करणे किंवा पत्ता नवीन करणे या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी होणार आहे. विशेष म्हणजे एका ठिकाणी हा बदल केल्यावर इतर सर्व ठिकाणी तो बदल ऑटोमॅटीक होणार आहे.



रिपोर्टनुसार, पोर्टल विशिष्ट पद्धतीने डिजाइन केले आहे. त्यामुळे एकाच इंटरफेसच्या माध्यमातून वेगवेगळे डॉक्यूमेंट्स एकत्र करता येणार आहे. युजरला पोर्टलवर जाऊन नावात बदल, पत्त्यात बदल किंवा मोबाइल क्रमांक बदल असा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर गरजेचे दस्तावेज अपलोड करावे लागणार आहे.


मग केवळ तीन दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचे डॉक्यूमेंट अपडेट होणार आहे. तुम्हाला अपडेट केलेले ओळखपत्र हवे असेल तर पोर्टलवर अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर सात दिवसांत अपडेट ओळखपत्र तुमच्या घरी येणार आहे. तसेच तुम्ही जवळच्या कार्यालयातून नवीन डॉक्युमेंट कलेक्ट करु शकतात. काही वर्षांपूर्वी सरकार कागदपत्रे मिळवणे म्हणजे मोठे द्राविडी प्राणायाम ठरत होते.

Comments
Add Comment