वासुदेव आला - कविता आणि काव्यकोडी

हातात चिपळ्या
गळ्यात माळा
मोरपिसांची टोपी
गाता गळा

घोळदार झगा
काखेत झोळी
खांद्यावर शेला
टिळा कपाळी

पावा वाजवीत
अंगणात येई
देवाची गाणी
सुरात गाई

सुपातील धान्य
झोळीत घेई
‘दान पावलं...’
आरोळी देई

मुलांचा घोळका
जमतो भोवती
आनंदाला मग
येतेच भरती

सकाळच्या पारी
हरीनाम बोला
गाव जागं करायला
वासुदेव आला
हो वासुदेव आला...

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१)किलबिल याच्या
पडती कानी
यालाच सुचतात
फुलांची गाणी

फांद्या याच्या
हलती छान
हसते कोणाचे
पान न् पान ?

२) येथे भेटते
मित्रमंडळ
गुरुजी, बाई
खूप प्रेमळ

वह्या, पुस्तके
आणखी अभ्यास
कोठे होतो
आपण पास?

३) गाय, वासरू
मांजर, मोती
मला पाहताच
हरखून जाती

त्यांच्याशी आहे
माझी दोस्ती
कोण बरं हे
माझे सोबती?

उत्तर -


१) झाड
२) शाळा
३) पाळीव प्राणी
Comments
Add Comment

खरे धाडस

कथा : रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा