Thursday, October 9, 2025

वाल्मिक कराडला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि...

वाल्मिक कराडला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि...
बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. न्यायालयीन आदेशानुसार तो कच्चा कैदी म्हणून सध्या बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. कारागृहातच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अस्वस्थ वाटू लागले. तब्येत बिघडू लागल्याचे बघून कारागृह प्रशासनाने वाल्मिक कराडला वैद्यकीय मदत दिली. डॉक्टरांनी तपासणी करुन वाल्मिक कराडला पॅनिक अॅटॅक आल्याचे सांगितले. तातडीने उपचार केल्यानंतर वाल्मिक कराडला निवडक वैद्यकीय तपासण्या करुन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. या तपासण्यांच्या अहवालाआधारे डॉक्टर वाल्मिकवर पुढील उपचार करणार आहेत.
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराड यानेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा सीआयडीचा आरोप आहे. या प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराड आणि इतर सहा जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सीआयडीने कराड आणि इतर आरोपींच्या विरोधात अनेक पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. याच प्रकरणातील अन्य एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलीस त्याला शोधत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
Comments
Add Comment