दुचाकीला धडकून विहिरीत पडली व्हॅन, सहा जणांचा मृत्यू

मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. मृतांमध्ये विहिरीत पडलेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाचाही समावेश आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातील नारायणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुढा - टकरावत फाट्याजवळ घडली. अपघात आज म्हणजे रविवार २७ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता झाला.



इको व्हॅनच्या चालकाने वेळ वाचवण्यासाठी वेग पटकन वाढवला. पण वेग वाढवल्यामुळे व्हॅन अनियंत्रित झाली. अनियंत्रित व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यानंतर व्हॅन जवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडली. व्हॅनची धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार गोबर सिंह आणि एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला. व्हॅनमध्ये असलेल्यांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला. व्हॅनसह विहिरीत पडलेल्यांना वाचवण्यासाठी एकाने प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यावेळी विहिरीत कारमुळे मोठ्या प्रमाणात गॅसची निर्मिती झाली. या गॅसमुळे विहिरीत उतरलेल्या मनोहर सिंह याचा मृत्यू झाला. अपघातात चार जण जखमी झाले.

व्हॅनमध्ये चालक आणि दोन मुलांसह एकूण १३ जण होते. हे सर्वजण उज्जैन जिल्ह्यातील उन्हेल येथून नीमच जिल्ह्यातील मानसा भागात असलेल्या अंतरी माता मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात होते. वेळ वाचवण्यासाठी चालकाने व्हॅनचा वेग वाढवला आणि अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या तीन वर्षांच्या मुलीसह चार जणांना वाचवण्यात आले. जखमींना मंदसौर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री जगदीश देवदा, जिल्हाधिकारी अदिती गर्ग, एसपी अभिषेक आनंद, अतिरिक्त एसपी गौतम सोलंकी आणि एसडीओपी नरेंद्र सोलंकी घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य वेगाने सुरू आहे. अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडरही घटनास्थळी पाठविण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून