मुंबई(ज्ञानेश सावंत): आज मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर लखनऊशी भिडणार आहे.आयपीएल २०२५ मध्ये मुंबई व लखनऊ हे दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या अगोदरच्या सामन्यात लखनऊने मुंबईला १२ धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य नक्कीच उंचावलेले असणार. आयपीएलच्या अठराव्या हंगामात आता चुरस निर्माण झाली आहे, गुणतक्त्यात जे संघ अव्वल आहेत त्या प्रत्येकाची जिंकण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
गुणांबद्दल बोलायचे झाले तर मुंबई व लखनऊ यांचे गुण समान आहेत परंतु मुंबईची सरासरी ही लखनऊ पेक्षा चांगली आहे त्यामुळे मुंबई वरच्या स्थानी आहे. दोन्ही संघाचा विचार करायचा झाल्यास अगोदरच्या सामन्यात मुंबईकडे बुमराह नव्हता त्यामुळे त्यांची गोलंदाजी परिपूर्ण नव्हती. आजच्या सामन्यात मुंबई पूर्ण ताकदीने खेळेल कारण त्यांना मागील पराजयाचा वचपा काढायचा आहे.
लखनऊही मुंबईला हलक्यात घेणार नाही कारण आजचा विजय त्यांच्यासाठी आवश्यक आहे. अन्यथा नंतर त्यांना पात्रता फेरी गाठण्यासाठी आणखी अडचणी येऊ शकतात. या अगोदरचा सामना लखनऊने दिल्ली विरुद्ध गमावला आहे त्यामुळे आज ते जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील.वानखेडेवर दोन्ही संघाचा भर हा फलंदाजीवरच असेल कारण हे मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचे सलामीचे फलंदाज फॉर्म मध्ये आहेत.
चला तर जाणून घेऊयात आजच्या सामन्याचा सिंकदर कोण!
मुंबई : आपल्याला कधीकधी कामानिमित्त किंवा फिरायला जाताना विमान प्रवास करावा लागतो. विमान प्रवास कितीही…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्यास सुरवात झाली आहे.…
मुंबई : सध्याचं जग हे महिला सबलीकरणाचं जग आहे. एकेकाळी फक्त पुरुषांसाठी असलेले अनेक मार्ग…
नागपुरात सर्वाधिक, तर मुंबईत केवळ १४ मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी…
बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या…
पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…