AC Compressor: उन्हाळयात ​AC कम्प्रेसर फुटून आग लागण्याचा धोका सर्वाधिक! ही घ्या काळजी

  75

AC Compressor Summer Care: उन्हाळा सुरु होताच एसी कंप्रेसरचा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर येतात. पण असे का होते? आणि याला कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत? हे प्रत्येकांनी जाणून घेणे गरजेचं आहे. तुमच्याही घरात एअर कंडिशनर बसवले असेल, तर तुम्ही एसी आणि त्याच्या कंप्रेसरशी संबंधित काही गोष्टी माहिती करून घेणे गरजेचं आहे.

उन्हाळ्यात AC चा वापर वाढतो, ज्यामुळे AC च्या बाह्य युनिटवर अत्यधिक ताण येतो. अशावेळी त्याची योग्य काळजी घेतली नाही तर त्याची कार्यक्षमता खालावते, इतकेच नव्हे तर यामुळे गंभीर आग देखील लागू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात एसी कम्प्रेसर थंड ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

एसी कम्प्रेसरची अशी घ्या काळजी


बहुतांश एसी कम्प्रेसर हे बाहेर उघड्यावर असतात, जिथे उन्हाचा तडाखा बसून ते लगेच गरम होऊ शकतात. अत्यधिक गरम वातावरणात त्यावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो, ज्यामुळे ते निष्क्रिय होऊ शकतात किंवा त्यात काही तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे एसी कम्प्रेसरला थंड ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.

एसीचा कम्प्रेसर थंड ठेवण्यासाठी टिप्स



  • आपण पाहतो की बहुतेक AC कम्प्रेसर बाहेर उघड्या ठिकाणी ठेवलेले असतात, जसे की गच्ची, छतावर तसेच खिडकीच्या बाहेर, अशा ठिकाणी सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात पडत पडतो, यामुळे कम्प्रेसर जास्त गरम होऊ शकतो. ज्यामुळे अत्यधिक उष्णता निर्माण होऊन तो निकामी होऊ शकतो, काही प्रकरणात कम्प्रेसर फुटू देखील शकतो. त्यामुळे, कधीही सावली किंवा छताखाली कम्प्रेसर ठेवा किंवा त्याच्या आसपास थोडा इन्शेड (Shade) निर्माण करा.

  • कंडेन्सर कॉईल्स हे एसीचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यावर धूळ, माती आणि कचरा जमा होऊ शकतो, जो एसीची कार्यक्षमता कमी करतो. नियमितपणे कंडेन्सर कॉईल्स स्वच्छ करा. यासाठी, एसीमध्ये असलेल्या फिल्टर आणि कॉईल्स योग्य पद्धतीने धुऊन घ्या.

  • कम्प्रेसरच्या आजूबाजूला ठेवलेल्या ज्वलंतशील वस्तू, प्लास्टिकच्या बाटल्या, आसपासची झाडं किंवा इतर कोणतेही सामान असतील तर ते बाजूला करा. कारण जर एसी कम्प्रेसरच्या आसपास अडथळा असेल तर, बाह्य युनिटला थंड हवा मिळत नाही, आणि कम्प्रेसर जास्त गरम होऊ शकतो.

  • एसी सेट करताना तापमान अधिक न ठेवल्याने कम्प्रेसरवर कमी ताण येतो आणि तो थंड राहू शकतो.

  • एसीचे एअर फिल्टर जितके स्वच्छ असतील, तितके अधिक प्रभावीपणे थंड वारे वाहतील, आणि कम्प्रेसरवर देखील कमी ताण येईल. त्यामुळे नियमितपणे फिल्टर स्वच्छ करणे तसेच बदलणे गरजेचे आहे.

  • एसीची मोटर आणि त्याचे तंत्रज्ञान देखील चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे. मोटर योग्यरित्या काम करत नसल्यास, एसीला अधिक लोड येऊ शकतो, त्यामुळे कम्प्रेसर गरम होण्याची शक्यता वाढते.

  • काही लोकं कम्प्रेसरवर पाण्याचा धारा सोडतात (Water cooling method) जेणेकरून एसीला थंड ठेवता येईल. ह्यामुळे कम्प्रेसर अधिक कार्यक्षम होतो.

  • अशाप्रकारे नियमित देखभाल, स्वच्छतेचे पालन आणि योग्य सेटिंग्ज लक्षात घेतल्यास कम्प्रेसराला गरम होण्यापासून वाचवता येईल, जेणेकरून उन्हाळयात एसी कम्प्रेसर तापून त्यातून धूर तसेच आग लागण्याच्या संभाव्य धोके टाळण्यास मदत मिळू शकेल.

Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे