मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश दाखविला तेव्हा असे वाटत होते की हा आयपीएल हंगाम हैदराबाद गाजविणार, परंतु दोन सामन्यानंतर त्यांचा संघ फार काही पराक्रम करू शकला नाही. आता पर्यंत ते आठ सामन्यापैकी सहा सामने पराभुत झाले आहेत त्यामुळे यापुढील जास्तिजास्त सामने त्यांना जिंकावे लागतील. त्यांच्या फलंदाजामध्ये सातत्याचा अभाव असल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागते.
इशान किशन सुरुवातीचे दोन सामने फक्त खेळला बाकी सर्व सामन्यात तो संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकला नाही. हैदराबादचे आघाडीचे सर्वच फलंदाज फॉर्ममध्ये आहेत परंतु मारण्याच्या नादात ते विकेट गमावून बसतात. एक ते दोन फलंदाजाना खेळपट्टीवर ८-१० षटके टिकून रहावे लागेल. समोरच्या सर्व संघानी हैदराबादच्या फलंदाजाचा कसून अभ्यास केला व त्याप्रमाणे प्रत्येक दोन चेंडूनंतर एक स्लोवर चेंडू टाकला जातो ज्यामुळे विकेट गमावली जाते.
हैदराबादची गोलंदाजी ही खास होत नाही आहे त्यामुळे गेल्या आठ सामन्यांत ते एकदाही समोरच्या संघाला लवकर गुंडाळू शकले नाहीत. चेन्नईचा संघ ही फळदाजीमध्ये कमी पाडतो आहे. आघाडीचे फलंदाज संघाला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकत नाहीत. धावांचा पाठलाग करताना ही हा संघ कमी पडतो आहे. आजच्या सामन्या बद्दल बोलायचे झाले तर हैदराबादचा संघ हा चेन्नई पेक्षा उजवा दिसतो. कारण दोन नवीन खेळाडू हैदराबादच्या संघात शेवटच्या षटकात खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. पर्वाच्या सामन्याप्रमाणे हेनरिक क्लासेन व अभिनव मनोहर संघाला चेन्नई विरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. चला तर बघूया चेन्नई घरच्या मैदानावर हैदराबादला कसा शह देते.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…