पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

  85

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द...


भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची झोप उडाली?


जम्मू : काश्मीरमधील निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली असून, सुरक्षा यंत्रणा अतिरेकी शोध मोहीमेसह उच्चस्तरावर अलर्ट मोडवर आहेत. भारताचे युद्धसज्ज पवित्रा पाहून पाकिस्तानमध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय प्रतिहल्ल्याची धास्ती घेऊन पाकिस्ताननं एलओसीजवळची गावं तातडीनं रिकामी केली असून, लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.


दहशतवाद्यांच्या कुरापतींचं खापर आता पाकिस्तानच्या डोक्यावर फुटत असून, त्यांच्याच संरक्षणाखाली फोफावलेल्या अतिरेक्यांनी पुन्हा एकदा भारतीय पर्यटकांना लक्ष्य केल्यानं देशभरात संतापाचा भडका उडाला आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेनजीक प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून आहे, तर संरक्षण यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे.



सर्जिकल स्ट्राइक, हवाई हल्ला किंवा यावेळी समुद्रमार्गेही कारवाई होण्याची शक्यता पाकिस्ताननं गृहीत धरली असून, सीमेलगतची अनेक गावं रिकामी केली जात आहेत. पाकिस्तानी नौदलाच्या कवायती देखील सुरू आहेत.



पाकिस्तानने भारताच्या सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. फक्त जमिनीवरूनच नाही तर समुद्रातूनही. लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर, पहलगामनंतर भारतीय नौदल प्रत्युत्तर देऊ शकते अशी भीती आता पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानने लगेचच त्यांच्या नौदलाच्या थेट गोळीबाराच्या सरावाचा इशारा दिला. पाकिस्तानने अरबी समुद्रात दोन दिवसांसाठी 'नवरेआ अलर्ट' जारी केला आहे. २३ एप्रिल रोजी थेट गोळीबाराचा इशारा देण्यात आला. हा सराव २४ ते २५ एप्रिल दरम्यान आहे. या इशाऱ्यात, कराची आणि ग्वादरजवळील विमाने आणि व्यापारी जहाजांना या सरावाच्या क्षेत्रापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. या सरावात, पाकिस्तानी नौदलाने पृष्ठभागावर आणि जमिनीखाली थेट गोळीबार केला.


पाकिस्तानमध्ये सध्या कमालीचा गोंधळ असून, लढाऊ विमाने रात्री आकाशात घिरट्या घालत आहेत, तर उच्चस्तरीय लष्करी बैठकांमधून बचावाचे उपाय शोधले जात आहेत.


बालाकोटच्या धडकीदायक आठवणी पाकिस्तानच्या अजून ताज्या असतानाच, भारताकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईची भीती त्यांच्या मनात घर करून बसली आहे. त्यातच भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडला अलर्टवर ठेवण्यात आलं असून, युद्धनौका सज्ज करण्यात आल्या आहेत.


संपूर्ण सीमावर्ती वातावरण तणावपूर्ण बनलं असून, भारत आता संयमाच्या सीमारेषेवर आहे. मात्र, जर पुन्हा असा हल्ला झाला, तर भारताकडून कठोर आणि निर्णायक पावले उचलली जातील, हे नक्की!

Comments
Add Comment

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या

'श्री गणेश करूया...' म्हणत रशियन राजदूताने सुरू केली अमेिरकेवर टीका

भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात

गाझा पट्टीत इस्रायलचे सैनिक, गाझा ताब्यात घेणार

गाझा : इस्रायलच्या सैन्य तुकड्या गाझा पट्टीत घुसू लागल्या आहेत. शक्य तितक्या लवकर संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात