मोदी सरकार भारत - पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू सीमेवर अनेक ठिकाणी शेती, घनदाट जंगल, नदी - नाले - ओढे आहेत. यामुळे सीमा १०० टक्के सील करणे भारतासाठी कठीण आहे. यावर उपाय म्हणून मोदी सरकारने इस्रोच्या उपग्रहांची मदत घेण्याची तयारी सुरू केली आहे.



सध्या इस्रोचे ५५ उपग्रह विविध कामांत गुंतले आहेत. लवकरच लहान आकाराचे पण उच्च क्षमतेचे असे १०० ते १५० उपग्रह अंतराळात पाठवून केंद्र सरकार भारत - पाकिस्तान सीमा सील करणार आहे. यानंतर जर कोणी विना परवानगी पाकिस्तानमधून सागरी अथवा भू सीमा ओलांडून येत असेल तर उपग्रहामुळे जवळच्या सुरक्षा यंत्रणेला संदेश मिळेल. घुसखोरी नेमकी कोणत्या जागेवरुन होत आहे त्याची माहिती मिळेल. घुसखोरांचे लाईव्ह फूटेज उपलब्ध होईल. यामुळे सुरक्षा पथकांना तातडीने कारवाई करुन घुसखोरीला आळा घालणे शक्य होणार आहे.



केंद्र सरकार सीमेवरील बंदोबस्तासाठी उपग्रहांची मर्यादीत प्रमाणात मदत घेते. पण नव्या योजनेनुसार १०० ते १५० उपग्रह फक्त सागरी तसेच भू सीमा सील करणे आणि घुसखोरीला आळा घालणे यासाठीच वापरले जाणार आहेत. या उपग्रहांचे सीमावर्ती भागात इतर उपयोग पण केले जातील. पण सुरक्षेच्या कारणामुळे या संदर्भात सरकारी पातळीवरुन जास्त माहिती देण्यात आलेली नाही.

भारताचा स्पेस डॉकिंगचा सलग दुसरा प्रयोग यशस्वी

भारताने अलिकडेच अंतराळात स्पेस डॉकिंगचा सलग दुसरा प्रयोग यशस्वी केला. या प्रयोगांना मिळणाऱ्या यशातूनच भविष्यात भारताला दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपग्रहांना एकमेकांशी जोडणे अथवा अंतराळ स्थानकाची निर्मिती करणे हे शक्य होणार आहे. स्पेस डॉकींगची क्षमता अमेरिका, रशिया, चीन आणि भारत या चार देशांकडेच आहे.
Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.