महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू


मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी लोक वस्ती होत असून या आकड्यांत सातत्याने वाढ होत आहे. तसेच ही वाढती आकडेवारी राज्यातील सुखसुविधा, आरोग्य विभागाकडून केले जाणारे विशेष प्रयत्न या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करते. त्याचप्रमाणे एका वर्षात दर हजार व्यक्तींमागे होणाऱ्या जिवंत संख्येला जन्म दर म्हणून संबोधले जात असून जन्म आणि मृत्यू नोंदणी ही वैयक्तिक हक्कांचे रक्षण करण्याच्यादृष्टीने आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय, सामाजिक सेवांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. तथापि प्रत्येक जीवाला सुरक्षित आयुष्य मिळावे यासाठी शासन कायम प्रयत्नशिल असते. मात्र तरी देखील अनेक नवजात जीव त्यांचा पाचवा वाढदिवस पाहण्याआधीच मृत्युमुखी पडतात.


महाराष्ट्रात २०१७ ते २०२३ दरम्यानच्या बालमृत्यू नोंदणीवर लक्ष केंद्रित केल्यास असे लक्षात येते की, या वर्षात १,१७,१३६ नवजात शिशू मृत्यूमुखी पडले असून यांची सरासरी दररोज सुमारे ४६ मृत्यू झाल्याचे दर्शवीते. हा आकडा आश्चर्यचकित करणारा असून नवजात मृत्यू दर वाढीवर प्रश्नचिन्हही उपस्थित करतो. आरटीआयद्वारे मिळवलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, मुंबईत सर्वाधिक २२,३६४ बालमृत्यू नोंदवले गेले आहेत, तर नाशिक, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि अमरावती यासारख्या इतर अनेक जिल्ह्यांनी वर्षानुवर्षे होणाऱ्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. तथापि, अमरावती येथे २०२१ मध्ये १३०७ मृत्यूची नोंद झाली होती. २०२० मध्ये कोविड-१९ साथीच्या काळात मृत्यूची संख्या कमी झाली परंतु त्यानंतरच्या काळात ती वाढून २०२३ मध्ये १७,४३६ वर पोहोचली.


मुंबई, संपूर्ण संख्येत आघाडीवर असून मुंबईची आरोग्य व्यवस्था ताणतणावात आहे. "मुंबईत नोंदवलेल्या जवळजवळ ४०% अर्भक मृत्यू चुकीच्या मार्गाने, सल्लामुळे, अपुऱ्या सुविधानामुळे होत असल्याचे बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले." तसेच शेजारील ठाणे जिल्ह्यातही मृत्यू दर वाढीचा तीव्र कल दिसून आला आहे. जिल्ह्यात २०१७ ते २०२३ दरम्यान ६,५६२ बालमृत्यूंची नोंद झाली. युनिसेफ नुसार बाळाच्या आयुष्याचे पहिले २८ दिवस (नवजात शिशुचा काळ) हा बाळाच्या जगण्यासाठी सर्वात असुरक्षित काळ असतो. तसेच तज्ज्ञांनी यावर दिलेल्या स्पष्टीकरणानुसार थांबलेले-चुकलेले लसीकरण, बंद असलेल्या अंगणवाड्या, आहार-पोषणाच्या संदर्भात न झालेले सर्वेक्षण, पुरेशा पोषण आहाराचा अभाव, रोजगार गमावल्यामुळे आलेली भ्रांत, कुपोषित माता, अपुऱ्या दिवसांची प्रसूती या एक ना अनेक कारणांमुळे बालमृत्यूंचा ओघ वाढल्याचे दिसत असून सुविधांचा अभाव यास कारणीभूत आहे का असा सवाल उपस्थित करतो.

Comments
Add Comment

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण

पश्चिम रेल्वेचे प्रवासी-केंद्रित विकासाचे ऐतिहासिक वर्ष

२०२५ मुंबई : २०२५ हे वर्ष पश्चिम रेल्वेसाठी एक ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी वर्ष म्हणून उदयास आले. हे वर्ष

राष्ट्रपतींचा 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास

मुंबई : भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी अरबी

पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६

आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी