Shakti Kapoor: सोन्याचे दर वाढणार; शक्ती कपूरने ३५ वर्षांपूर्वीच केलेली 'ही' भविष्यवाणी

मुंबई: अनेक लोकांना हा प्रश्न पडला आहे की सोन्याचे भाव १ लाख पर्यंत कसे पोहोचले. याचदरम्यान अभिनेता शक्ती कपूर याचा ३५ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर पहिल्यांदाच सोन्याच्या किमतीने प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. याबाबत, १९९८ मध्ये आलेल्या ‘गुरु’ सिनेमातील शक्ती कपूरची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

व्हिडीओमध्ये शक्ती कपूर म्हणतोय, ‘आणि त्यानंतर सोन्याचे दर वाढणार. ५ हजार तोळं आहे, १० हजार तोळं होणार. त्यानंतर ५० हजार तोळ होणारं… सोनं लाख रुपयांवर जाणार…’ शक्ती कपूरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकरी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.



व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘शक्ती कपूर शेअर बाजारातील सर्वोत्तम विश्लेषक आहे. सोने १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज अनेक दशकांपूर्वी वर्तवण्यात आला होता.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जगातील सर्वोत्तम संशोधन विश्लेषक आणि बॉलिवूडचे बाबा वांगा शक्ती कपूर…’ सध्या सर्वत्र शक्ती कपूर यांची चर्चा रंगली आहे.

शक्ती कपूर यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ सिनेमात भूमिका बजावली होती. त्यानंतर शक्ती कपूर यांनी ‘मेरे हस्बँड की बीवी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले. त्यानंतर शक्ती कपूर यांनी कोणत्याच सिनेमाची घोषणा केलेली नाही.

Comments
Add Comment

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा