व्हिडीओमध्ये शक्ती कपूर म्हणतोय, ‘आणि त्यानंतर सोन्याचे दर वाढणार. ५ हजार तोळं आहे, १० हजार तोळं होणार. त्यानंतर ५० हजार तोळ होणारं… सोनं लाख रुपयांवर जाणार…’ शक्ती कपूरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकरी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच ऐन उन्हाच्या कडाक्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या ...
व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘शक्ती कपूर शेअर बाजारातील सर्वोत्तम विश्लेषक आहे. सोने १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज अनेक दशकांपूर्वी वर्तवण्यात आला होता.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जगातील सर्वोत्तम संशोधन विश्लेषक आणि बॉलिवूडचे बाबा वांगा शक्ती कपूर…’ सध्या सर्वत्र शक्ती कपूर यांची चर्चा रंगली आहे.
शक्ती कपूर यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ सिनेमात भूमिका बजावली होती. त्यानंतर शक्ती कपूर यांनी ‘मेरे हस्बँड की बीवी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले. त्यानंतर शक्ती कपूर यांनी कोणत्याच सिनेमाची घोषणा केलेली नाही.
Shakti Kapoor had it all figured out 35 years ago !#Gold pic.twitter.com/dLnMTUe7iT
— Alok Jain ⚡ (@WeekendInvestng) April 10, 2024