श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम अतिरेकी हल्ल्याशी संबंधित तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अतिरेक्यांविषयी ठोस माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. माहिती खरी असल्याचे आढळले तर अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. यानंतर माहिती देणाऱ्या व्यक्तीला वीस लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल; असे जम्मू काश्मीर पोलिसांनी जाहीर केले आहे. ही जाहिरात जम्मू काश्मीर पोलिसांच्यावतीने अनंतनाग पोलीस ठाण्याने प्रसिद्ध केली आहे.
पोलिसांनी तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यातील प्रत्येक अतिरेक्यावर प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांच्या कलाकाराने रेखाचित्र काढली आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेली माहिती आणि पोलीस चौकशीतून हाती आलेली माहिती याची पडताळणी करुन पोलिसांनी तीन अतिरेक्यांची रेखाचित्र त्यांच्या नाव आणि पत्त्यासह प्रसिद्ध केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), अली भाई उर्फ तल्हा भाई, हाशिम मुसा उर्फ सुलेमान या तीन अतिरेक्यांची रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…