श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम अतिरेकी हल्ल्याशी संबंधित तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अतिरेक्यांविषयी ठोस माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. माहिती खरी असल्याचे आढळले तर अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. यानंतर माहिती देणाऱ्या व्यक्तीला वीस लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल; असे जम्मू काश्मीर पोलिसांनी जाहीर केले आहे. ही जाहिरात जम्मू काश्मीर पोलिसांच्यावतीने अनंतनाग पोलीस ठाण्याने प्रसिद्ध केली आहे.
पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तान ...
पोलिसांनी तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. अतिरेक्यांविषयी ठोस माहिती देणाऱ्या व्यक्तीला वीस लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल
गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस काश्मीर या अतिरेकी संघटनेने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...
अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांच्या कलाकाराने रेखाचित्र काढली आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेली माहिती आणि पोलीस चौकशीतून हाती आलेली माहिती याची पडताळणी करुन पोलिसांनी तीन अतिरेक्यांची रेखाचित्र त्यांच्या नाव आणि पत्त्यासह प्रसिद्ध केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), अली भाई उर्फ तल्हा भाई, हाशिम मुसा उर्फ सुलेमान या तीन अतिरेक्यांची रेखाचित्र प्रसिद्ध केली आहेत.