Wednesday, May 14, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि १० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये तसेच देशात इतरत्र अनेक महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तर प्रमुख रस्त्यांवर सुरक्षा जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठिकठिकाणी नागरिकांची अंगझडती तसेच त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा पथकाने जम्मू काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात दोन अतिरेक्यांना ठार केले.

बारामुलातील एका भागात दोन ते तीन अतिरेकी असल्याची ठोस माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली. ही माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यात आली. सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. तिसऱ्या अतिरेक्याचा शोध सुरू आहे.

चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार २३ एप्रिल रोजी सकाळी बारामुलातील उरी नालामार्गे सरजीवन परिसरातून अतिरेक्यांनी घुसखोरी केली. ठोस माहिती मिळताच सुरक्षा पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोन अतिरेकी ठार झाले. तिसऱ्या अतिरेक्याचा शोध सुरू आहे.

पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यापैकी सहा जण महाराष्ट्रातील आहेत. या घटनेनंतर सुरक्षा पथकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.





Comments
Add Comment