पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचे आयोजन २२ एप्रिल रोजी म्हाडा येथील गुरुकुल शाळेच्या सभागृहात प्रांताधिकारी प्रवीणवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी काही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत चिट्ट्या उडवून शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. यामध्ये गागोदे खुर्द ही एकमेव ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली असून, १४ ग्रामपंचायतींमध्ये आदिवासी समाजाचे सरपंच विराजमान होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका काही महिने लांबणीवर गेल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून कारभार सुरू ठेवण्यात आला होता. मात्र आता सरपंच आरक्षण सोडत होत असल्याने लवकरच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या पेण तालुक्यातील ६४ सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीत गागोदे खुर्द ही एक ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली.
कळवे, मसद बुद्रुक, सोनखार, आमटेम, हमरापूर, अंतोरे, जिर्णे या सात अनुसूचित जमाती महिला सरपंच पदाकरीता असून, तर काळेश्री, कणे, दूरशेत, वढाव, वाशी, जीते, जोहे या खुला प्रवर्ग असे एकूण १४ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये महिला आरक्षित शिर्की, रावे, वरेडी, कांदळे, मळेघर, रोडे, झोतीरपाडा, वरवणे, निधवली या नऊ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव असून, यात खुल्या प्रवर्गासाठी दिव, कासू, खरोशी, वडखळ, बेणसे, कुहिरे, आंबेघर, शेडाशी या आठ ग्रामपंचायती अशा एकूण १७ ग्रामपंचायती आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, तर सर्वसाधारण सरपंच पदाकरिता महिला खारपाले, डोलवी, कोलेटी, पाटणोली, कोप्रोली, उंबर्डे, शिहू, बेलवडे बुद्रुक, कामार्ली, जावळी, सावरसई, वाक्रुळ, महलमिऱ्या डोंगर, करोटी, वाशीविली, वरप या सोहा जागा ठेवण्यात आल्या असून, यामध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी बोर्झे, दादर, कोपर, बोरी, काराव, मुंढाणी, आंबिवली, निगडे, दुश्मी, बळवली, तरणखोप, वरसई, बोरगाव, करंबेली छत्तीशी, पाबळ, सापोली या सोळा जागा ठेवण्यात आले आहेत. सोडतीवेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद काळेकर, नायब तहसीलदार नितीन परदेशी, लिपिक नरेश पवार, पंजाब राठोड आदींसह महसूल कर्मचारी तसेच तालुक्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरिक, राजकीय पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…