पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी आपला जवळचा मित्र गमावला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे ही दुःखद बातमी शेअर केली.
भारताचे स्वित्झरलँड म्हणून ओळखले जाणारे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवार, दिनांक 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य करत गोळीबार केला. या हल्ल्यात 28 निरपराध लोकांचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या धक्कादायक घटनेच्या विरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू आणि राजकीय व्यक्तिमत्वांनी या घटनेविरुद्ध निषेध आणि शोक व्यक्त केला. ज्यात मराठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे यांनी देखील या घटनेसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टद्वारे त्यांनी लोकांना आणखीन एक धक्का दिला आहे. तो म्हणजे, या हल्ल्यात त्यांनी त्यांचा जिवलग मित्र गमावल्याचे सांगितले आहे.
प्रविण तरडेने पोस्ट शेअर करत पहलगाम हल्ल्यात जवळचा मित्र गमावल्याची माहिती दिली. त्याने पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘आतंकवाद आज घरात आला..माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला. मित्रा संतोष माफ कर आम्हाला. आम्ही काही करु शकत नाही.’ ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, लोकं कमेंटमध्ये दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहत आहेत.
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…