तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाल्याची नोंद केली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी इस्तंबूलजवळ मरमारा समुद्रात १० किमी. खोल होता. या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.
पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध
याआधी सहा फेब्रुवारी २०२३ रोजी तुर्कस्तानमध्ये ७.८ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला होता. यानंतर काही तासांत आणखी एक भूकंप आला. या लागोपाठच्या मोठ्या धक्क्यांमुळे तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील ११ प्रांत उद्ध्वस्त झाले होते. लागोपाठच्या दोन भूकंपांमुळे तुर्कस्तानमधील शेकडो इमारती कोसळल्या. अनेक इमारतींची पडझड झाली. सरकारी आकडेवारीनुसार ५३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. सीरियाच्या उत्तरेकडील भागात भूकंपामुळे सहा हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.