CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या आजारांचे निदान करण्यासाठी डॉक्टर रुग्णांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देतात. मात्र अलीकडच्या अभ्यासात याच्या वापराबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत. कारण यामुळे संभाव्य कर्करोग होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सीटी स्कॅनबद्दल काळजी करावी का? ते किती सुरक्षित आहे? तसेच, सीटी स्कॅन कोणी करू नये? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात घर करत आहेत. तर हा अभ्यास नेमका काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
अमेरिकेत झालेल्या एका नवीन अभ्यासात सीटी स्कॅनच्या वापरावरून काही चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत, कारण त्यात म्हटले आहे की अमेरिकेत संगणकीय टोमोग्राफी (CT) तपासणीमुळे भविष्यात १०३,००० कर्करोग होऊ शकतात, जे सर्व नवीन कर्करोग निदानांपैकी ५% असतील. अभ्यासाच्या लेखकांनी असा अंदाज वर्तवला आहे की २०२३ मध्ये केलेल्या ९३ दशलक्ष स्कॅनमुळे १००,००० पेक्षा जास्त कर्करोग होण्याची शक्यता आहे. हा अभ्यास जामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला होता.
हा एक केवळ सैद्धांतिक दावा असून, मानवी वास्तविक केस स्टडीजद्वारे याचा पुरावा मिळालेला नाही. असे असले तरी, सीटी स्कॅनमध्ये एक्स-रे, डिजिटल एक्स-रे, मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) आणि अल्ट्रासाऊंड सारख्या इतर इमेजिंग तंत्रांप्रमाणे आयनीकरण रेडिएशनचा वापर केला जातो. आयनीकरण रेडिएशन डीएनएला नुकसान पोहोचवू शकते, जे एखाद्यावर वारंवार केल्यास, कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
भारताच्या तुलनेत अमेरिकेत सीटी स्कॅनचे प्रमाण जास्त आहे. असे असले तरी. एकाच स्कॅनमध्ये रेडिएशनचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे कर्करोगाचा धोका उद्भवत नाही, असे तज्ज्ञ मत व्यक्त करतात.
छातीचा एक्स-रे तुम्हाला ०.०६ ते ०.२५ एमएसव्ही रेडिएशनच्या संपर्कात आणतो, जो रेडिएशन एक्सपोजर मोजणारा एक युनिट आहे. मॅमोग्राम तुम्हाला ०.२१ एमएसव्हीपर्यंत पोहोचवतो आणि तुलनात्मकदृष्ट्या नियमित सीटी स्कॅन तुम्हाला १० एमएसव्हीपर्यंत पोहोचवू शकतो. हे रेडिएशन जास्त आहे कारण सीटी स्कॅन अधिक तपशीलवार माहिती गोळा करतो. तरीही, हे खूपच कमी आहे आणि आतापर्यंत मानवी विषयांमध्ये दीर्घकालीन हानी पोहोचवणारे सिद्ध झालेले नाही.
थोडक्यात काय तर वारंवार सीटी स्कॅन केल्याने रेडिएशन-प्रेरित कर्करोगाचा धोका वाढू शकतो. तसेच इतर चाचणीच्या तुलनेत सीटी स्कॅन भारतीय लोकांसाठी खर्चिक देखील असल्या कारणामुळे डॉक्टर इतर पर्यायांचा विचार करतात. त्यामुळे भारतात सीटी स्कॅनमुळे कर्क रोगाचे प्रमाण कमी आहे.
गर्भवती महिला आणि गर्भांना रेडिएशनचा धोका असतो. ज्यांना वारंवार वैद्यकीय निदानाची आवश्यकता असते अशा दीर्घकालीन वैद्यकीय स्थिती असलेल्या लोकांना देखील सीटी स्कॅनचा कमीत कमी वापर करावा. त्याचप्रमाणे काही रुग्णांना सीटी स्कॅनमध्ये वापरल्या जाणाऱ्या आयोडीन कॉन्ट्रास्ट डाईची अॅलर्जी देखील असते, तर अशा लोकांनी देखील सीटी स्कॅनपासून दूर राहणे योग्य.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…