Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ सोशल मीडियावर वादात सापडला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा चालू आहे. ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली आहे. अनेकांनी "देशप्रेमापेक्षा चित्रपट महत्त्वाचा नाही" असे म्हणत चित्रपट निर्मात्यांवर आणि कलाकारांवर टीका केली आहे.

सध्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा किंवा कोणतीही प्रतिक्रिया निर्मात्यांकडून आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील बहिष्कार मोहिम पाहता निर्मात्यांना चित्रपटाच्या प्रचारात अडचणी येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या वादावर चित्रपट टीमकडून स्पष्टीकरण येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



 

पहलगाम येथील हल्ल्यात जवानांना लक्ष्य केल्याने देशभरात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये स्थान दिले जात असल्याचे अनेकांना खटकले आहे.अनेकांनी केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाकडे अशा चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काहींनी असेही नमूद केले आहे की, जर बॉलिवूडला राष्ट्रहित जपायचे असेल, तर पाकिस्तानी कलाकारांनवर बंदी घातलीच पाहिजे.

Comments
Add Comment

शोलेचा 'वीरू' गेला, बॉलिवूडवर शोककळा

मुंबई: बॉलिवूडचा हीमॅन धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना

आजीच्या साडीतून बनवलेला कॉश्च्यूम घालून रोहित राऊतने गायले 'रोअर ऑफ सह्याद्री'

मुंबई : सध्या सोशल मीडियावर i-popstar या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम होणारा हा शो १८

TMKOC फेम भव्य गांधीने बबितासोबतच्या साखरपुड्याच्या अफवेवर सोडलं मौन

मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता भव्य गांधी, म्हणजेच सगळ्यांचा

नेटकरी मलायकावर भडकले! आधीच झाली ट्रोल, त्यात प्रतिक्रिया पण 'बोल्ड'; बघा Video

मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका

जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा- 'ताठ कणा'

मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी