असे करा फसवणूकीतून संरक्षण :-
- कोणत्याही बुकिंगसाठी पेमेंट करण्यापूर्वी वेबसाइटची प्रामाणिकता तपासा.
- गुगल, फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवरील प्रायोजित किंवा अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका. या लिंक्समागे फसव्या वेबसाइट्स असण्याची शक्यता असते.
- बुकिंगसाठी फक्त सरकारी वेबसाइट्स किंवा विश्वासार्ह ट्रॅव्हल एजन्सींचा वापर करा. खोट्या ऑफर्सच्या आकर्षणाला बळी पडू नका.
- जर तुम्हाला फसवणुकीचा संशय असेल, त्वरित राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) तक्रार नोंदवा किंवा १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा.
- व्यावसायिक दिसणाऱ्या वेबसाइट्सवर आंधळा विश्वास ठेवू नका, आणि पेमेंट करण्यापूर्वी सेवेची खात्री करा. व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावरून बुकिंग करताना स्रोताची पडताळणी करा.