Monday, October 20, 2025
Happy Diwali

१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन जणांना ५ वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. या प्रकरणात विजया बँकेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक दामोधर कामत, माधव एंटरप्रायझेसचे मालक निखिल पट आणि एजंट सुरज तायडे दोषी ठरले.

या घोटाळ्याची सुरुवात २०१२ मध्ये झाली होती. कामत यांनी बनावट LC जारी केल्यावर बँक ऑफ इंडिया (BOI)च्या विलेपार्ले शाखेकडून १० कोटी रुपये मंजूर झाले. पाचवे LC देताना संशय आल्याने चौकशी झाली आणि फसवणुकीचा पर्दाफाश झाला.

विशेष न्यायाधीश ए. व्ही. खरकर यांनी १७ एप्रिल रोजी दिलेल्या निकालात कामत यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी ठरवत १५ लाख दंड ठोठावला. निखिल पट यांना ८ कोटींचा दंड आणि सुरज तायडे यांना ३० लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे.

या प्रकरणात एक आरोपी मृत असून दोन फरार आहेत. सात आरोपींपैकी एका आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.

दरम्यान, देशाच्या आर्थिक रचनेवर घात करणाऱ्या पांढरपेशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे कठोर शिक्षा देणे आवश्यक होते, असे न्यायालयाने नमूद केले.

Comments
Add Comment