Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात (Pune News) सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. कोयता गँग, रस्ते अपघात, अत्याचार, चोरी अशा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) महत्त्वाचा निर्णय हाती घेतला आहे. पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी याबाबत योजना आखली आहे. त्यानुसार पुणे पोलीस गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींवर २४ तास नजर ठेवणार आहेत. (Pune Crime)



पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ३७ हजार ४०८ गुन्हेगारांची यादी केली आहे. या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांचे 'गुगल मॅपिंग' (Google Mapping) केले जाणार आहे. सध्या पोलिसांनी पहिल्या टप्प्यात चार हजार गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले असून यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी हालचाल सुरू करण्यात आली आहे. 'गुगल मॅपिंग'द्वारे मकोका, एमपीडीए, गोळीबार, खून आणि खुनाच्या प्रयत्नातील प्रत्येक आरोपींवर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस लक्ष ठेऊन असणार आहेत. वाढत्या गुन्हेगारीला चाप बसण्यासाठी पुणे पोलिसांनी ही पावले उचलली आहेत


दरम्यान, पुण्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी यापूर्वीही पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केले जात होते. परंतु यामुळे पोलिस प्रत्यक्ष गुन्हेगारांच्या घरी गस्त घालतात की नाही यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष देखरेख ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे आता गुगल मॅपिंग सुरु केले असून पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना त्यांनी गुन्हेगाराच्या घरी भेट दिली का, हे स्पष्ट होणार आहे.



काय आहे गुगल मॅपिंग?


जगभरातील नकाशे पाहण्याची आणि दिशानिर्देश पाहण्यासाठी गुगलने 'गुगल मॅपिंग' (Google Mapping) ही सेवा सुरु केली आहे. एक वेब सेवा आहे जी जगभरातील भौगोलिक क्षेत्रे आणि स्थळांबद्दल तपशीलवार माहिती मिळवून देते. तसेच कोणत्याही ठिकाणाचा नकाशा पाहण्यासाठी, ठिकाणाचे दिशानिर्देश शोधण्यासाठी आणि काही ठिकाणांचे हवाई आणि उपग्रह दृश्ये पाहण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरते.
Comments
Add Comment

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय