Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते. तसेच या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोन्या-चांदीची खास करून खरेदी करणे शुभ मानले जाते. हा दिवस लक्ष्मी मातेशी संबंधित आहे. लक्ष्मी मातेला सोने अतिशय प्रिय आहे.

सोन्याला लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो. तसेच सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. या वर्षी अक्षय्य तृतीयेला राशीनुसार सोने खरेदी करा.

मेष रास


मेष राशीचे लोक अक्षय्य तृतीयेला सोन्याची अंगठी खरेदी करू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याची अंगठी परिधान केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात सूर्याचा प्रभाव वाढतो.

वृषभ रास


या राशीचे स्वामी शुक्र आहे ज्यांना चांदी प्रिय आहे. अशातच अक्षय्य तृतीयेला तुम्ही चांदीच्या वस्तू जसे नाणे, पैंजण इत्यादी खरेदी करू शकता.

मिथुन रास


अक्षय्य तृतीयेला मिथुन राशीचे लोक सोन्याची चेन खरेदी करू शकतात. जर बजेट नसेल तर सोन्याचे झुमकेही खरेदी करू शकतात.

कर्क रास


कर्क राशीच्या लोकांना सोन्यापेक्षा जास्त चांदी फायदेशीर आहे कारण या राशीचा स्वामी चंद्र आहे. चांदीची चेन अथवा ब्रेसलेट तुम्ही अक्षय़्य तृतीयेला खरेदी करू शकता.

सिंह रास


सिंह राशीचे लोकांना अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याची चेन अथवा हार खरेदी करणे अतिशय लाभदायक ठरते.

कन्या रास


अक्षय्य तृतीयेला सोन्याची बांगडी, नथ अथवा अंगठी खरेदी केल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकते.

तूळ रास


तूळ राशीचे लोक अक्षय़्य तृतीयेला चांदीची खरेदी करू शकतात. यामुळे पती-पत्नीमधील संबंध मजबूत राहतात.

वृश्चिक रास


अक्षय्य तृतीयेला वृश्चिक राशीचे लोक सोन्याची नथ, अंगठी खरेदी करू शकतात. यांचा स्वामी मंगळ असल्याने त्यांना सोने नेहमीच अनुकूल होत नाही. त्यामुळे सोने प्रमाणातच घाला.

धनू रास


धनू राशीच्या लोकांना सोने घालणे अतिशय लाभदायक असते. कारण यांचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या लोकांनी अक्षय्य तृतीयेला सोन्याची चेन, बिंदी, बांगडी अथवा हार खरेदी करू शकतात.

मकर आणि कुंभ रास


मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. अशातच या राशीचे लोक अक्षय़्य तृतीयेला चांदीचे कडे अथवा कोणतेही दागिने घेऊ शकतात.

मीन


मीन राशीचा स्वामी बुध आहे. अक्षय्य तृतीयेला तुम्ही सोन्याची बांगडी, हार, चेन, झुमके इत्यादी खरेदी करू शकता. यामुळे लक्ष्मी मातेची कृपा राहील.
Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे