
मुंबई : महाराष्ट्रातील वाढता उकाडा पाहता उन्हाळ्यात सगळ्यात जास्त होणारा त्रास म्हणजे उष्णतेचा त्रास. शरीराचं तापमान वाढतं, थकवा, डोकेदुखी, चक्कर, उलट्या असे अनेक त्रास होतात. वेळीच लक्ष दिलं नाही तर हीट स्ट्रोक म्हणजे उष्माघात होऊ शकतो.

मुंबई : छावा चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलची आणि त्याच्या पत्नीची सर्वत्र चर्चा असते. विकी कौशलने अवघ्या महाराष्ट्राचे ...
शरीरात जास्त उष्णतेचा त्रास ओळखण्याची काही ठळक लक्षणं आहेत. जास्त घाम येणे, अशक्तपणा आणि थकवा, चक्कर येणे आणि मळमळ, डोकेदुखी, उलट्या, शरीराचे तापमान वाढणं, हात, पाय आणि पोटात असह्य पेटके येणं ही काही सामान्य लक्षणं आहेत. काहींना पायावर सूज येऊ शकते तर काहींना श्वास घ्यायला त्रासही होऊ शकतो. जर ही लक्षण दिसत असतील तर वैद्यकीय मदत तर घ्याच पण काही प्रथमोपचार नक्की करा..
सर्वप्रथम कपडे घामाने भिजलेले असतील तर ते ताबडतोब बदला. शरीरावर गार पाणी ओतून शरीर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर शक्यतो सुती किंवा मलमलचे कपडे वापरा. रूम टेंपरेचरवर असलेलं पाणी प्या, कारण त्याने तहान भागते. थकवा जाणवत असेल तर साखर-मीठ टाकून पाणी प्या. शक्य असल्यास लिंबू अथवा कोकम सरबत प्या. शांत आणि थंड वातावरणात विश्रांती घ्या. जेणेकरून तुमची एनर्जी टिकून राहील.