Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट घालायला आवडते. सध्या मार्केटमध्ये अँकलेटसच्या फार डिझाईन्स पाहायला मिळतात. तुम्हालासुद्धा अँकलेटस घालायला आवडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी चांदीच्या अँकलेटचे असे डिझाइन घेऊन आलो आहोत जे पाहून तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता.



पायांचे सौंदर्य



विवाहित महिला आणि नववधूंच्या पायांवर पायाची फुले खूप छान दिसतात. यामध्ये, पायाची अंगठी अँकलेटसह जोडलेली असते.त्यामुळे लग्नासाठी पैंजण म्हणून ही अतिशय सुंदर डिझाईन आहे.
फोटो सौजन्य : mitalipayalsagra



सुंदर अँकलेट डिझाइन



अँकलेटमध्ये या प्रकारची डिझाइन पसंत केली जाते. हे पैंजण एकदम साधं आहे, पण यांची बांधण्याची पद्धत वेगळी आहे. फोटो सौजन्य : marwari_silver_store



स्टायलिश अँकलेट डिझाइन



जर तुम्हाला खूप रंगीबेरंगी अँकलेट डिझाइन आवडत नसतील तर तुम्हाला हे डिझाइन नक्कीच आवडेल.अतिशय सुंदर आणि भरगच्च दिसणारं पैंजण तुमच्या पायांचे सौंदर्य नक्कीच वाढवेल.  फोटो सौजन्य : marwari_silver_store



सोबर अँकलेट



आधुनिक अँकलेट डिझाइन पायामध्ये खूप छान दिसतात. जर तुम्ही कुर्ती परिधान केली असेल तर तुम्ही या प्रकारच्या डिझाइनचा वापर करू नक्की शकता.। फोटो सौजन्य : kabras_silverplaza




चैन डिझाईन



या अँकलेटची ही डिझाईन एकदम सोबर दिसते. एक साखळी आणि त्याच्यावर केलेलं फुलांचं काम हे पायात बघण्यासाठी खूप सुंदर दिसतं. फोटो सौजन्य : hub_jewellery_darbar



भरगच्च घुंगरू पैंजण



जर तुम्हाला पैंजणांच्या घुंगरांचा आवाज फार आवडत असेल तर तुम्हाला या प्रकारचे पैंजण नक्कीच आवडतील. तुम्ही त्यात अनेक घुंगरू घालू शकता.। फोटो सौजन्य : marwari_silver_store



नाणे अँकलेट डिझाइन



आता ही डिझाईन नेकलेस म्हणा किंवा गळ्यातल्या चोकरमध्ये पाहायला मिळतेच. मात्र आता अँकलेटमध्ये ही साजेशी डिझाइन खूप ट्रेंडमध्ये आहे. या प्रकारच्या पॅटर्नचे अँकलेट एथनिक आउटफिट्ससोबत सुंदर दिसतात. फोटो सौजन्य : shivamjwellerssj



बाजुबंद डिझाईन पैंजण



बाजुबंदासारखी डिझाईन आता पैंजणमध्ये सुद्धा पाहायला मिळते. तीन चार चैनची एक साखळी बनवून त्याच्यामध्ये रंगीबेरंगी डीझाईन तयार करून हे अँकलेट बनवलेलं असतं. कोणत्याही समारंभाराला तुम्ही हे पैंजण हमखास घालू शकता. फोटो सौजन्य : marwari_silver_store

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर