Breaking News : मुख्यमंत्र्यांना जायचं होतं दिल्लीला पण उतरले…

Share

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला जम्मूहून दिल्लीसाठी निघाले होते. परंतु, दिल्लीत विमानांची गर्दी असल्यामुळे त्यांचे विमान राजस्थानच्या जयपूर येथे लँड करावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या अब्दुल्लांनी रात्री १ वाजता ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला शनिवारी रात्री इंडिगोच्या विमानाने दिल्लीला दिल्लीला निघाले होते. परंतु दिल्ली विमानतळावर विमानांची गर्दी असल्याने विमान उतरण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे विमान दिल्लीत उतरू शकले नाही आणि विमान थेट जयपूरला वळवण्यात आले. तिथे रात्री उशिरा १ वाजता विमान पोहचले.

विमानातून उतरल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पारा चढला. त्यांनी एक सेल्फी शेअर करत सोशल मीडियावरून संतप्त भावना व्यक्त केल्या. “दिल्ली विमानतळ म्हणजे एक संपूर्ण गोंधळाची परिस्थिती आहे. जम्मूहून निघाल्यानंतर ३ तास हवेत फिरवून आम्हाला जयपूरला वळवलें. आता मी विमानाच्या जिन्यावर उभा राहून थोडी ताजी हवा घेत आहे. इथून कधी निघणार, काहीच कल्पना नाही.” असे अब्दुल्ला यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, शनिवारी श्रीनगर विमानतळावर खराब हवामानामुळे ६ विमाने रद्द करण्यात आली होती. यामुळे जम्मू विमानतळावरही अनेक प्रवासी अडकले होते. तिथे विमानांच्या उड्डानांना विलंब व रद्द होण्याच्या प्रकारांमुळे पूर्ण गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे शेकडो प्रवासी अडकल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली होती.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

38 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

39 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

46 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

50 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

58 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago