कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes Film Festival) तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.







फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे २०२५ या कालावधीत कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. कान या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. महामंडळामार्फत सन २०१६ पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहेत. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि जागतिक सिनेप्रेमींना मराठी चित्रपटाची भूरळ पडावी, हा यामागचा हेतू आहे. या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांचा यात समावेश होता.





स्थळ : भारतातील ग्रामीण भागातील पारंपारिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर भाष्य करणारा 'स्थळ' हा चित्रपट आहे. समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धत, रंगभेद आणि सामाजिक दृष्टिकोन अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. सचिन पिळगांवकर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. अभिनेत्री नंदिनी चिकटे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. जयंत सोमलकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

स्नो फ्लॉवर : 'स्नो फ्लॉवर' या मराठी चित्रपटात मार्मिक, क्रॉसकंट्री कथा सांगणारा आहे. रशिया आणि कोकण या दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा हा चित्रपट आहे. बर्फाळ सायबेरिया आणि हिरवेगार कोकण यांच्या विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विठ्ठल अहिरे, छाया कदम, वैभव मांगले आणि सरफराज आलम सफू हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

खालिद का शिवाजी : राज मोरे यांच्या 'खालिद का शिवाजी' या चित्रपटात खालिद हा मुलगा मुस्लिम धर्मीय असल्याने त्याला इतर मुलं एकटं पाडतात. त्याचे निरागस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

जुनं फर्निचर : महेश मांजरेकर अभिनीत आणि दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्त्वावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात वृद्धापकाळात पोहोचल्यावर आपलीच मुले आपल्याला कशाप्रकारे नाकारतात आणि त्यामुळे होणारे हाल दाखवण्यात आले आहेत. अभिनेता भूषण प्रधान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक