KEM Hospital : केईएम रुग्णालयातील प्राध्यापक निलंबित, पण कारण काय?

सहा महिला डॉक्टरांनी लैंगिक छळाची दाखल केली तक्रार


मुंबई : परळ येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) न्यायवैद्यक व विषविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. रविंद्र देवकर (Dr Ravindra Deokar) यांना सहा महिला डॉक्टरांनी लैंगिक छळाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने निलंबित करण्यात आले आहे.


या सहा महिला डॉक्टरांनी १२ एप्रिल रोजी भायखळा येथील भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना डॉ. देवकर यांनी वारंवार अश्लील वर्तन केल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी त्यांच्या केईएम वसाहतीतील निवासस्थानावर नोटीस चिकटवली आहे, कारण अनेक वेळा संपर्क साधूनही त्यांचा फोन बंद असून घरीही कोणी सापडले नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम यांनी सांगितले.



दरम्यान, महापालिकेच्या अंतर्गत लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने (POSH) आणि रुग्णालय प्रशासनानेही स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. डॉ. देवकर यांनी "मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी तक्रारीची माहिती घेतली असून, चौकशीला पूर्ण सहकार्य करेन," असे वक्तव्य केले आहे.


डॉ. देवकर यांच्या वतीने त्यांचे वकील सौरभ ताम्हणकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली असून, ही सुनावणी शनिवारी होणार आहे.


डॉ. देवकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७४ (अनिच्छित शारीरिक संपर्क, संकेत वा लैंगिक टिप्पणी), ७५ (लज्जा भंग करण्याच्या हेतूने गुन्हेगारी बलप्रयोग) व ७९ (लज्जा भंग करण्याच्या हेतूने उद्देशाने केलेली कृती) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या सहा डॉक्टरांनी १० एप्रिल रोजी विभागप्रमुख डॉ. हरीश पाठक व अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. विशेष म्हणजे, २०२१ मध्येही डॉ. देवकर यांच्याविरोधात एका महिला डॉक्टरने अशीच तक्रार केली होती, परंतु त्या नंतर परदेशात गेल्यामुळे प्रकरण पुढे नेले गेले नाही, अशी माहिती डॉ. रावत यांनी दिली. यावेळी मात्र त्यांनी प्रकरण थेट अतिरिक्त महापालिका आयुक्त व बीएमसी रुग्णालयांच्या संचालकांकडे सोपवले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.